शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

महाबीजच्या बियाणे उत्पादकांना हमीभावातील फरकाची रक्कम मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 1:13 PM

अकोला: राज्यातील महाबीज बीजोत्पादक शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून कृषी उत्पन्न बाजार समिती आधारित दर व शासन आधारभूत किमतीमधील फरकाची रक्कम अदा करण्यासाठी राज्य शासनाकडून विशेष योजना लागू करण्यात आली आहे.

अकोला: राज्यातील महाबीज बीजोत्पादक शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून कृषी उत्पन्न बाजार समिती आधारित दर व शासन आधारभूत किमतीमधील फरकाची रक्कम अदा करण्यासाठी राज्य शासनाकडून विशेष योजना लागू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अभ्यासपूर्ण माहिती देऊन ही विशेष योजना सुरू करण्याच्या खासदार तथा महाबीजचे संचालक संजय धोत्रे यांच्या प्रयत्नाला यश आले आहे. यासंदर्भात २८ डिसेंबर रोजी आयोजित महाबीजच्या आमसभेत त्यांचा संचालक, शेतकरी भागधारकांच्यावतीने सत्कार करण्यात येणार आहे.महाबीज अकोला व राष्ट्रीय बीज निगम, पुणे यांच्यामार्फत बीजोत्पादक शेतकºयांना त्यांनी उत्पादित केलेल्या पात्र बियाण्यास संबंधित जिल्ह्यातील विहित कालावधीतील दररोजच्या महत्तम भावाचा सरासरी दर अधिक पीक वाण व बियाणे दर्जानिहाय २० ते ३५ टक्के प्रोत्साहनपर रक्कम याप्रमाणे खरेदी धोरण पेरणी हंगामापूर्वी जाहीर करण्यात येते. सद्यस्थितीत महत्तम बाजारभाव हमीभावापेक्षा खूप कमी असून, बीजोत्पादक शेतकरी महामंडळास उत्पादित बियाणे देण्यास तयार नाहीत. त्यामुळे पुढील वर्षी राज्यात विविध बियाण्यांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता होती. या सर्व बाबींचा विचार करून खा. संजय धोत्रे यांनी शेतकºयांना आधारभूत किमतीपेक्षा कोणत्याही परिस्थितीत कमी रक्कम मिळू नये याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सदर प्रकरणी अभ्यासपूर्वक सादरीकरण केले. मुख्यमंत्र्यांनी प्रस्ताव मान्य करण्यात येईल, असे आश्वासन खा. धोत्रे दिले होते. याप्रकरणी तत्कालीन कृषिमंत्री स्व. पांडुरंग फुंडकर तसेच विद्यमान कृषी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला तसेच शासनाकडून देय रकमेपोटी आर्थिक तरतूद आवश्यक असल्याने राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंजुरीस दुजोरा दिला.खा. संजय धोत्रे यांच्या मार्गदर्शनात सदर प्रस्तावाचा मंत्रालयीन पाठपुरावा अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांनी निरंतर प्रयत्न केले. त्याचे फलित म्हणून २०१७-१८ च्या उत्पादनापासून राज्यात उत्पादित प्रमाणित व पायाभूत बियाण्यासाठी पीकनिहाय आधारभूत किंमत ही विहित कालावधीतील कृषी उत्पन्न बाजार समिती आधारित दरांपेक्षा जास्त असल्यास यामधील फरकाची रक्कम महाबीजमार्फत नवीन शेतकºयांना देण्याबाबतची योजना शासनाने लागू केली आहे. शासनाने हमीभाव हे विहित कालावधीतील कृषी उत्पन्न बाजार समिती आधारित दरापेक्षा जास्त असल्यास यामधील फरकाची रक्कम महाबीज अकोला व राष्ट्रीय बीज निगम, पुणे यांच्यामार्फत बीजोत्पादक शेतकºयांना देण्याबाबतची योजना अमलात आणली आहे. या अंतर्गत खरीप, रब्बी हंगाम २०१७-१८ मध्ये तयार झालेल्या व २०१८-१९ पासून पुढे वेळोवेळी उपलब्ध होणाºया बियाण्यांमधील फरकाची रक्कम बीजोत्पादक शेतकºयांना देण्यासाठी लागू राहील.

-बीजोत्पादकांना होणार फायदा !२०१७-१८ मध्ये  मूग, उडीद, तूर, धान, हरभरा, करडी सोयाबीन व गहू इत्यादी बीजोत्पादकांना या योजनेचा फायदा होणार आहे.  महाबीज कार्यक्षेत्रातील उत्पादित पायाभूत व  प्रमाणित बियाण्यांची मात्रा ३ लाख ४० हजार ३२९ क्ंिवटल असून, २९ जिल्ह्यातील १० हजार २९४ बीजोत्पादक शेतकºयांना फरकाची रक्कम म्हणून सुमारे ३० कोटी रुपये वाटप करण्यात येणार आहेत.  यामध्ये हरभरा व मूग यांना एक हजार रुपये, उडीद पंधराशे रुपये, तूर तेराशे रुपये याप्रमाणे फरकाची रक्कम अदा करण्यात येणार आहे. योजना खरीप व रब्बी हंगाम २०१७-१८ मध्ये तयार झालेल्या व २०१८-१९ पासून पुढे वेळोवेळी उपलब्ध  होणाºयांना बियाण्यातील फरकाची रक्कम बीजोत्पादक शेतकºयांना देण्यासाठी लागू राहणार असल्याने बीजोत्पादक शेतकºयांना कायमस्वरूपी लाभ मिळणार आहे, हे या योजनेचे मोठे यश आहे. - शासनाचे आभार मानणार !२८ डिसेंबर २०१८ रोजी  होऊ घातलेल्या महाबीजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बीजोत्पादक शेतकरी तसेच भागधारकांच्यावतीने शासनाप्रती आभार व्यक्त करण्यासोबतच खा. संजय धोत्रे तथा संचालक महाबीज यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाMahabeejमहाबीजSanjay Dhotreसंजय धोत्रे