शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

अळसपुरेंच्या बदलीसाठी माफिया एकवटले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 01:55 IST

जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख तथा सहायक पोलीस निरीक्षक हर्षराज अळसपुरे यांच्या धडाकेबाज कारवायांमुळे त्यांच्या बदलीची फिल्डिंग लावण्यात आली आहे.

ठळक मुद्देअमरावती येथून फिल्डिंगसहा महिन्यात बदलीचे प्रयत्न

सचिन राऊत । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख तथा सहायक पोलीस निरीक्षक हर्षराज अळसपुरे यांच्या धडाकेबाज कारवायांमुळे त्यांच्या बदलीची फिल्डिंग लावण्यात आली आहे. अमरावती व अकोल्यातील गुटखा माफिया, सट्टा माफिया यांनी एकत्र येत अळसपुरे यांची कुठल्याही परिस्थितीत बदली करण्याच्या हालचाली सुरू केलेल्या आहेत. यामध्ये पोलीस खात्यातील काही अधिकारीही बदलीसाठी देव पाण्यात बुडवून बसले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्यासह पोलीस खात्याची मान उंचावणार्‍या कारवाया विशेष पथकाने केलेल्या आहेत. अमरावती विभागातील पाच जिल्हय़ांत एवढय़ा कारवाया पोलिसांच्या इतिहासात झालेल्या नसताना हर्षराज अळसपुरे यांनी सात महिन्यांच्या कालावधीत उत्तुंग कारवाया करीत तब्बल साडेतीन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे, तर ४७२ वर आरोपींना अटक केली आहे. यामध्ये हुक्का पार्लर, पुस्तक विक्रेत्यांवरील कारवाई, तब्बल १00 वर जनावरांना जीवनदान, गुटखा माफियाला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या जाळय़ात अडकवून अकोला पोलिसांच्या प्रामाणिकतेचा राज्य स्तरावर झेंडा रोवण्याचे काम अळसपुरे यांच्या कारकिर्दीत झाले. याच कारवाया गुटखा माफिया, सट्टा माफिया व हप्तेखोर पोलिसांच्या जिव्हारी लागल्याने, या अभद्र युतीने हर्षराज अळसपुरे यांच्या बदलीची फिल्डिंग लावली. एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केलेला नसताना अळसपुरे यांना हटविण्यासाठी सर्व ताकद लावण्यात आली आहे. मात्र, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर व गृहखाते अळसपुरेंच्या पाठीशी असल्याने त्यांच्या बदलीसाठी प्रयत्न करणार्‍यांच्या मनसुब्यांवर पाणी फेरले जात आहे. एकूणच कारवाईचा सपाटा थांबणार नसल्याचे लक्षात येताच, एका इमानदार अधिकार्‍याला टार्गेट करून फसविण्याचा घाटही घालण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलीस अधीक्षक ठामपणे पाठीशी असल्याने अद्याप तरी अळसपुरेंच्या बदलीला ब्रेक लागला आहे. 

राज्यात आठ बडे गुटखा माफियाराज्यात आठ बडे गुटखा माफिया असून, यामध्ये अमरावती येथील गुटखा किंगचा समावेश आहे. या आठ बड्या गुटखा माफियांचा ‘बॉस’ बनण्याचा प्रयत्न ठाणे क्राइम ब्रांचने अटक केलेल्या इक्बाल कासकरने केला होता, अशी माहिती ठाणे पोलिसांच्या बयानात समोर आली. मात्र, या कासकर याला अटक करण्यात आल्योन त्याचे प्रयत्न असफल ठरले. यामधीलच काही गुटखा माफिया अळसपुरेंची बदली करण्यासाठी मुंबईतही ठाण मांडून बसले आहेत.

गृह राज्यमंत्र्यांकडेही हालचालीकाही माफियांनी अळसपुरे यांच्या बदलीसाठी गृह राज्यमंत्र्यांकडे हालचाली सुरू केल्या होत्या. मात्र, या ठिकाणावरून साफ नकार आल्याने अळसपुरे यांच्या बदलीसाठी फिल्डिंग लावणारे नाऊमेद झाले आहेत. अळसपुरेंसारखा खमक्या अधिकारी अकोल्यात आवश्यक असल्याचे, या माफियांना सांगण्यात आल्याने माफियांनी अमरावती येथून फिल्डिंग लावण्यात आल्याची माहिती आहे.

तासाप्रमाणे लाखोंचे नुकसानगुटखा माफियांनी अकोल्यात गुटख्याचा पुरवठा करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे अकोल्यात गुटखा विक्री बंदच्या परिस्थितीत असून, त्यामुळे गुटखा माफियांच्या साखळीचे तासाप्रमाणे लाखो रुपयांनी नुकसान होत आहे. याच प्रकारामुळे अळसपुरेंची बदली करण्यासाठी चारही बाजूने प्रयत्न करण्यात येत आहे. गुटख्याचा पुरवठा होत नसल्याने ५0 ते ७0 पैशांची एक पुडी सात रुपयांनाही विकली जात आहे.