नीलेश शहाकारबुलडाणा, दि. २३ : नवजात अर्भकास एक तासाच्या आत स्तनपान दिल्यास २0 टक्के अर्भक मृत्यू टाळता येतात. ही बाब लक्षात घेता, स्तनपानाला प्रोत्साहन देण्याकरिता तसेच अर्भक मृत्यू दर कमी करण्याच्या दृष्टीने राज्यभरात आता ह्यमाह्ण हे अभियान राबविण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्याकरिता अतिरिक्त निधी केंद्र शासनाकडून मंजूर करण्यात येणार आहे.मातेचे स्तनपान हे बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. ही बाबत लक्षात घेऊन केंद्र शासनाच्यावतीने ५ ऑगस्ट पासून ह्यमदर एॅब्सल्यूट अँफेक्शनह्ण अर्थात ह्यमाह्ण या अभियानाला केंद्रस्तरावर सुरुवात करण्यात आली असून आता सदर अभियान राज्यपातळीवर राबविण्यात येणार आहे. हे अभियान जुलै २0१७ पर्यंत कार्यान्वित राहणार आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी ४.३ लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात येणार आहे.शासनाने केलेल्या सर्वेक्षणानुसार, बालकांना जन्मापासून सुरुवातीच्या सहा महिन्यांपर्यंत स्तनपान केले जाते, अशा बालकांमध्ये इतर बालकांच्या तुलनेने न्युमोनिया होण्याचे प्रमाण १५ पटीने आणि अतिसार होण्याचे प्रमाण ११ पटीने कमी असते. यामुळे स्तनपानाला प्रोत्साहन देण्याकरिता तसेच अर्भक मृत्यूू दर कमी करण्याच्या दृष्टीने हे अभियान राबविण्यात येत आहे.विदर्भातील अर्भक मृत्यू (२0१५-१६)अमरावती ७0६अकोला ६८७गडचिरोली ६0९बुलडाणा ५४७गोंदिया ४६१चंद्रपूर ४५५भंडारा ३४६नागपूर २९७यवतमाळ २६८वाशिम २0८वर्धा १५२विदर्भात ५ हजार २४३ अर्भक मृत्यूची नोंदमहाराष्ट्र राज्य कुटुंब कल्याण विभागाने सादर केलेल्या माहितीनुसार राज्याच्या एकूण अर्भक मृत्यूतील २0 टक्के मृत्यू हे विदर्भात झाले आहेत. गत वर्षभरात विदर्भात ५ हजार २४३ अर्भक मृत्यूची नोंदणी करण्यात आली आहे; मात्र स्तनपान सप्ताह व गरोदर माता पोषण आहार योजनेतून ही आकडेवारी कमी करण्यात राज्य शासनाला बर्याचपैकी यश प्राप्त झाले आहे.
अर्भक मृत्यू टाळण्यासाठी ‘मा’ अभियान राबविणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2016 00:18 IST