शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

लक्झरी बस उलटली, युवती ठार

By admin | Updated: May 18, 2017 01:09 IST

आकोट : खासगी प्रवासी वाहतूक करणारी लक्झरी बस अचानक उलटून झालेल्या अपघातात एक युवती ठार झाली असून, अनेक प्रवासी जखमी झाले आहेत.

अकोट - अंजनगाव मार्गावरील घटना: अनेक प्रवासी जखमीलोकमत न्यूज नेटवर्कआकोट : खासगी प्रवासी वाहतूक करणारी लक्झरी बस अचानक उलटून झालेल्या अपघातात एक युवती ठार झाली असून, अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अकोला येथे हलविण्यात आले. रस्त्यावरील वाहनधारकांनी वाहने थांबवून लक्झरीमधील जखमींना बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. हा अपघात अकोट - अंजनगाव मार्गावरील वाई फाट्यानजिक १७ मे रोजी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास घडला. खासगी प्रवासी वाहतूक करणारी एम पी ४८ पी 0१६२ या क्रमांकाची लक्झरी बस अकोटवरुन अंजनगावकडे जात होती. त्यावेळी वाई फाट्यानजीक रस्त्याच्या कडेला अचानक लक्झरी उलटली. या अपघातात रुकैया परविन इस्त्राईलशा (१९) रा.अंजनगाव या युवतीचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला, तर फइम खान जब्बार खान रा.परतवाडा, गजानन रामकृष्ण गोमासे रा.लखाड, आयशाबी बरकतखा हे गंभीर जखमी झाले आहेत. गंभीर जखमींना पुढील उपचारार्थ अकोला येथे हलविण्यात आले आहे. काही जखमींना घटनास्थळावरून परस्पर इतरत्र खासगी दवाखान्यात उपचारार्थ हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मनवरे, ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार पी.जे.अब्दागिरे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळ गाठले. अपघात नेमका कशामुळे घडला, याची माहिती मिळू शकली नाही. अपघात झाल्यानंतर घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती तर दोन्हीकडून वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. के्रेनच्या साह्याने लक्झरी बस हटविण्यात आली. हा अपघात अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला. याप्रकरणी पोलिसांनी लक्झरीचालकास चौकशीकरिता ताब्यात घेतले असून, उशिरा रात्रीपर्यंत यासंदर्भात कार्यवाही सुरू होती.