शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

व-हाडातील धरणांमध्ये अल्प जलसाठा!

By admin | Updated: November 8, 2014 23:25 IST

सिंचनाला पाणी मिळणे कठीणच.

अकोला: वर्‍हाडातील बहुतांश धरणांमध्ये यावर्षी अल्प जलसाठा असून, ५0 टक्कय़ांच्या आत जलसाठा असलेल्या धरणांमधील पाणी यावर्षी सिंचनासाठी सोडण्यात येणार नसल्याचे वृत्त असल्याने, यावर्षी रब्बी हंगाम धोक्यात आला आहे.वर्‍हाडातील अमरावती वगळता अकोला, वाशिम, बुलडाणा व यवतमाळ या उर्वरित चार जिल्हय़ांमध्ये यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने, चारही जिल्हय़ांमधील धरणांच्या पातळीत अपेक्षित वाढ झाली नाही. त्यातही अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्हय़ांमध्ये तर फार कमी पाऊस झाला. त्यामुळे यावर्षी सर्वप्रथम पिण्याच्या पाण्यास प्राधान्य दिल्या जाणार आहे. अकोला जिल्हय़ातील मोठय़ा, मध्यम व इतर लघू प्रकल्पांची सिंचन क्षमता ३१ हजार हेक्टर एवढी आहे. काटेपूर्णा या मोठय़ा धरणांतर्गत जिल्हय़ातील सर्वाधिक ८,३२५ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आहे; परंतु या धरणात आजमितीस केवळ ३६ टक्के जलसाठा शिल्लक आहे. या जिल्हय़ात जलसंपदा विभागाने यंदा केवळ तीन हजार हेक्टरचे नियोजन केले आहे. बुलडाणा जिल्हय़ातील नळगंगा या मोठय़ा धरणात ५८ टक्के जलसाठा आहे. त्या धरणातील पाणी सिंचनासाठी द्यायचे की नाही, हा निर्णय जिल्हा प्रशासन घेणार आहे. वाशिम जिल्हय़ातील प्रकल्प छोटे आहेत. त्या जिल्ह्यातील धरणांमध्ये ५0 टक्क्यांपेक्षा थोडा अधिक जलसाठा असला तरी, छोट्या धरणांमधील पाणी अग्रक्रमाने पिण्यासाठी राखून ठेवल्या जाणार आहे. पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य असल्याने, धरणांमधील साठा व जिल्हय़ातील पिण्याच्या पाण्याचा आढावा घेऊन जिल्हा प्रशासन निर्णय घेईल, असे पाटबंधारे मंडळाचे अधिक्षक अभियंता रा. वि. जलतार यांनी स्पष्ट केले. * मंगळवारी ठरणार पाण्याचे आरक्षण अकोला जिल्हय़ातील धरणांच्या जलपातळीचा आढावा व आरक्षणासंदर्भात, ११नोव्हेंबर रोजी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सभा आयोजित करण्यात आली आहे. त्या सभेत शिल्लक जलसाठय़ाचा आढावा घेऊन, सिंचनाचा निर्णय घेतला जाणार आहे.