शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमी युगुलाचा रेल्वेखाली आत्महत्येचा प्रयत्न; युवकाचा मृत्यू, युवती गंभीर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 14:02 IST

अकोला: हरिहरपेठेतील रहिवासी एका प्रेमी युगुलाने गायगाव परिसरात रेल्वे रुळावर रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली.

ठळक मुद्देदेवीदास गोपाल धकिते (२२) व याच परिसरातील रहिवासी रिना गणेश हेडाऊ या दोघांचे प्रेमसंबंध होते. सायंकाळच्या सुमारास रेल्वेखाली उडी घेऊन सोबतच आत्महत्येचा प्रयत्न केला. यामध्ये युवक रेल्वेखाली आल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला आहे, तर युवती दूर फेकल्या गेल्यामुळे ती गंभीर जखमी झाली.

अकोला: हरिहरपेठेतील रहिवासी एका प्रेमी युगुलाने गायगाव परिसरात रेल्वे रुळावर रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. युवकाचा जागेवरच मृत्यू झाला असून, युवती गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.हरिहरपेठेतील रहिवासी देवीदास गोपाल धकिते (२२) व याच परिसरातील रहिवासी रिना गणेश हेडाऊ या दोघांचे प्रेमसंबंध होते; मात्र त्यांच्या प्रेमाला दोघांच्या कुटुंबीयांकडून विरोध असल्याची माहिती आहे. कुटुंबीयांच्या विरोधामुळे सोबत राहता येत नसल्याने या प्रेमी युगुलाने सोमवारी दुपारीच गायगाव रोडवरील बाराखोली परिसर गाठला. या ठिकाणी बराच वेळ सोबत राहिल्यानंतर त्यांनी सायंकाळच्या सुमारास रेल्वेखाली उडी घेऊन सोबतच आत्महत्येचा प्रयत्न केला. यामध्ये युवक रेल्वेखाली आल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला आहे, तर युवती दूर फेकल्या गेल्यामुळे ती गंभीर जखमी झाली आहे. या युवतीच्या पायाला जबर दुखापत झाली आहे. प्रेमी युगुलाने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती डाबकी रोड पोलिसांना मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. त्यानंतर छिन्नविच्छिन्न अवस्थेत असलेला युवकाचा मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयामध्ये पाठविला, तर गंभीर जखमी असलेल्या मुलीलाही उपचारासाठी तातडीने रुग्णालयात रवाना केले. या युवतीवर उपचार करण्यात येत असून, तिची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. या दोघांच्या कुटुंबीयांचा त्यांच्या प्रेमाला विरोध असल्यामुळेच त्यांनी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. या प्रकरणी डाबकी रोड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास डाबकी रोड पोलिसांनी सुरू केला असून, दोघांच्या आत्महत्येचा प्रयत्न करण्यामागे नेमके काय कारण आहे, याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. याच ठिकाणी घडले अमित-प्रतीक्षा हत्याकांडहरिहरपेठेतील प्रेमी युगुलाने बारा खोली परिसरात रेल्वे रुळावर ज्या ठिकाणी आत्महत्येचा प्रयत्न केला, त्याच ठिकाणावर अमित-प्रतीक्षा हत्याकांड घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रेमी युगुलाच्या आत्महत्येच्या प्रयत्नामुळे याच ठिकाणी घडलेले अमित-प्रतीक्षा हत्याकांड चर्चेत आले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी