शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

अकोला मनपाविरोधात हॉटेल व्यावसायिकांचे तीव्र आंदोलन

By admin | Updated: August 9, 2014 02:04 IST

हॉटेल्सच्या स्वयंपाकगृहात अस्वच्छता असल्यामुळे सील लावल्याने संतप्त झालेल्या हॉटेल व्यावसायिक व स्वीट मार्ट दुकानदारांनी शुक्रवारी कडकडीत बंद पाळला.

अकोला: महानगरपालिकेने शहरातील हॉटेल्सच्या स्वयंपाकगृहात अस्वच्छता असल्यामुळे सील लावल्याने संतप्त झालेल्या हॉटेल व्यावसायिक व स्वीट मार्ट दुकानदारांनी शुक्रवारी कडकडीत बंद पाळला. दुपारी १ वाजता खाद्य, पेय विक्रेता संघाच्यावतीने निवासी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन मनपाच्या कारभारावर व्यावसायिकांनी आपला रोष व्यक्त केला. तसेच मनपाविरुद्ध तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा खाद्य, पेय विक्रेता संघाने दिला आहे. जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनानुसार, हॉटेलमध्ये साफसफाई नसेल तर हॉटेलची तपासणी करून दंड करण्याचा अधिकार मनपा अधिकार्‍यांना आहे. मात्र, हॉटेल सील करण्याचा अधिकार मनपाला नाही. मनपा उपायुक्तांनी ६ ऑगस्ट रोजी शहरातील ६ हॉटेल्सला सील लावून ५0 हजार रुपये दंड ठोठावला. ही कारवाई अयोग्य व गैरकायदेशीर आहे. ही कारवाई व्यावसायिकांना त्रास देण्यासाठी करण्यात आली आहे. या कारवाईमुळे व्यापार्‍यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे व्यावसायिकांनी बंद पुकारला असून, त्वरित हॉटेल्सला लावलेले सील उघडण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी ओमप्रकाश गोयनका, किरण शहा, मनोज शहा, योगेश अग्रवाल, आनंद अग्रवाल, अशोक डाखरे, नीलेश निनोरे, हितेश वखारिया, भरत केजडीवाल, योगेश माहोरे, हरीश टोंगळे, अखिलेश पारिका, रामदास पारिका, दीपक अग्रवाल, संजय केजरीवाल यांच्यासह व्यावसायिक उपस्थित होते. हॉटेल व्यवसायिक नियमांचे पालन करीत नसतील, तर त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यास हरकत नाही; मात्र मनपा प्रशासन अतिरेकी कारवाई करीत असल्याचा आरोप यावेळी व्यवसायिकांनी केला. उपायुक्त चिंचोलकर यांनी हॉटेल्सला सील ठोकले; मात्र सर्व नियमांचे पालन करून हॉटेल व्यवसायिकांनी सील उघडण्याची मागणी महापालिकेकडे करण्याचा प्रयत्न केला असता, उपायुक्तांचा मोबाईल फोन शुक्रवारी, दिवसभर बंद असल्याचे आढळले. ही बाब योग्य नसल्याचे गार्‍हाणे व्यवसायिकांनी यावेळी मांडले.दरम्यान, हॉटेलमध्ये अस्वच्छता आढळली तर मनपाला २0 ते २00 रुपये दंड करण्याचा अधिकार आहे. मनपा आयुक्तांनी महासभेत एक हजार ते पाच हजार रुपये दंड ठोठावण्याची परवानगी घेतली. मात्र, मनपा हॉटेलला सील ठोकून ५0 हजार ते १ लाख रुपये दंड ठोठावत आहे. हे बेकायदेशीर आहे. मनपाने हॉटेल व्यावसायिकांवर कायद्यानुसार कारवाई करायला हवी. मात्र उपायुक्तांनी हॉटेलला सील ठोकून महासभेचा, मनपा अधिनियमनाचा व कायद्याचा अपमान केला आहे. मनपाने हॉटेलला लावलेले सील त्वरित उघडले नाही तर आपण स्वत: सील तोडणार असल्याचा इशारा माजी महापौर व काँग्रेसचे शहर अध्यक्ष मदन भरगड यांनी दिला आहे.