शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
3
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
4
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
5
वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज; आ. गोपीचंद पडळकरांना केला फोन, म्हणाले...
6
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
7
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
8
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
9
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
10
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
11
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
12
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
13
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
14
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
15
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
16
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
17
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
18
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
19
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
20
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...

आई-वडिलांचं छत्र हरविलं; अनाथ ‘करण’ जाणार कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 09:50 IST

जाणार तरी कुठे आणि पोटाची खळगी भरायची तरी कशी, याबाबतची चिंता अकोल्यात अडकलेल्या जळगाव खान्देश येथील १८ वर्षीय अनाथ ‘करण’ला सतावत आहे.

- संतोष येलकर  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: ‘लॉकडाउन’मध्ये अडकलेल्या आश्रित मजुरांना त्यांच्या गावी रवाना करण्याची व्यवस्था प्रशासनामार्फत सुरू करण्यात आली आहे; मात्र आई-वडिलांचे छत्र हरविले ...घर नसल्याने राहण्याची सोय नाही ...त्यामुळे जाणार तरी कुठे आणि पोटाची खळगी भरायची तरी कशी, याबाबतची चिंता ‘लॉकडाउन’मध्ये अकोल्यात अडकलेल्या जळगाव खान्देश येथील १८ वर्षीय अनाथ ‘करण’ला सतावत आहे.जळगाव खान्देश येथील एमआयडीसीच्या परिसरातील रहिवासी करण शंकरसिंह ठाकूर इयत्ता पाचवीत असतानाच आई-वडिलांचा अपघातात मृत्यू झाला. आई-वडिलांचे छत्र हरपल्यानंतर काही दिवस करण आजीसोबत राहत होता. इयत्ता दहावी अनुत्तीर्ण झाल्यानंतर काम करून पोट भरण्यासाठी त्याचा संघर्ष सुरू झाला. अकोल्यातील एका हॉटेलमध्ये काम करीत असतानाच, कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशभरात ‘लॉकडाउन’ लागू झाले. त्यामुळे हॉटेल बंद झाल्याने, हाताला काम नसल्याच्या स्थितीत अनाथ करण आश्रयासाठी आणि पोटाची खळगी भरण्याकरिता धडपड करीत असताना, दीड महिन्यांपूर्वी अकोल्यात आलेल्या मेंढपालांसोबत गांधीग्रामकडे गेला होता; मात्र तेथून मेंढपाळ पुढे निघून गेले आणि करण मागे राहिल्याने, सरपंचांनी त्याला तहसीलदारांकडे आणून सोडले. ‘लॉकडाउन’मध्ये अकोल्यात अडकलेल्या मध्य प्रदेशातील ६० मजुरांच्या निवास व भोजनाची व्यवस्था प्रशासनामार्फत अकोल्यातील खडकी भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहूद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठानमध्ये करण्यात आली होती. मध्य प्रदेशातील आश्रित मजुरांना ७ एप्रिल रोजी त्यांच्या गावाकडे रवाना करण्यात आले. आई-वडिलांचे छत्र नसलेल्या आणि राहण्यासाठी घरही नसल्याच्या स्थितीत ‘करण’ कुठे जाणार, असा प्रश्न प्रशासनातील अधिकाऱ्यांसमोरही निर्माण झाला. त्यामुळे प्रशासनाच्या सूचनेनुसार तात्पुरत्या स्वरूपात अनाथ करणच्या राहण्याची व भोजनाची व्यवस्था अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृ षी विद्यापीठातील कॅन्टीन चालक शेषराव काळे यांच्यामार्फत कॅन्टीनमध्ये करण्यात आली आहे.

काम करून पोट भरणार!आई-वडील नाहीत. घर नसल्याने राहण्याची सोय नाही. त्यामुळे इकडेच कुठेही राहून आणि काम करून पोटाची खळगी भरणार आहे, असे करण ठाकूर याने सांगितले.

सध्या ‘करण’च्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था डॉ. पंजाबराव देशमुख कृ षी विद्यापीठातील काळे यांच्या कॅन्टीनमध्ये करण्यात आली आहे. लवकरच करणला रोजगार उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. - डॉ. नीलेश अपार, उपविभागीय अधिकारी, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाLabourकामगार