शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

अकोला शहर विभागात विजेची सर्वाधिक वितरण हानी

By atul.jaiswal | Updated: February 10, 2018 17:14 IST

अकोला : राज्यात सर्वत्रच वीज वितरण हानी होत असली, तरी अकोला परिमंडळाअंतर्गत येत असलेल्या अकोला शहर विभागात वीज हानीचे प्रमाण हे सर्वाधिक आहे.

ठळक मुद्देविविध प्रयत्न व उपाययोजना केल्यानंतरही गळती रोखण्यात महावितरणला अपयश.वर्षभरात ३२ टक्क्यांवरची वीज वितरण हानी गेली ३४ टक्क्यांवर.अकोला शहर विभागाची फ्रॅन्चायझी खासगी कंपन्यांना देण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे.

- अतुल जयस्वाल

अकोला : राज्यात सर्वत्रच वीज वितरण हानी होत असली, तरी अकोला परिमंडळाअंतर्गत येत असलेल्या अकोला शहर विभागात वीज हानीचे प्रमाण हे सर्वाधिक आहे. संपूर्ण राज्यातील वीज गळतीचे प्रमाणे १४ ते १५ टक्के असताना, अकोला परिमंडळातील अकोला शहर विभागात हे प्रमाण तब्बल ३४.१५ टक्के एवढे आहे. ही हानी व गळती कमी करण्यासाठी सातत्त्याने विविध प्रयत्न व उपाययोजना केल्यानंतरही महावितरणला अपयश आल्याने अखेर अकोला शहर विभाग खासगी कंपनीला चालविण्यासाठी देण्याचा अर्थात ‘फ्रॅन्चायझी’ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महावितरणच्या मुख्य कार्यालयाने अकोला शहर विभाग येथे फ्रेंचायजी नियुक्तीसाठी २० फेब्रुवारी २०१८ पर्यंत प्रस्ताव मागविले आहेत.महावितरणने वीज गळती व चोरीचे प्रमाण अधिक असलेल्या ठाणे परिमंडळातील शीळ, मुंब्रा, कळवा हे तीन उपविभाग, नाशिक परिमंडळातील मालेगाव शहरातील तीन उपविभाग व अकोला परिमंडळातील अकोला शहर विभागाची फ्रॅन्चायझी खासगी कंपन्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. फ्रेंचायजी नियुक्तीसाठी प्रस्ताव मागितलेल्या अकोला शहरविभागामध्ये एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या कालावधीत वितरण हानी ३२.३३ टक्के होती. तर त्यानंतर एप्रिल २०१७ ते नोव्हेंबर २०१७ या कालावधीत ही वितरण हानी वाढून ३४.१५ टक्क्यांवर आली आहे.अकोला शहर विभागातील वीज देयक वसुलीचे प्रमाण कमी असून, वीज देयकांबाबतच्या तक्रारी व वीज चोरीचे प्रमाणही मोठे आहे. वीज गळतीचे प्रमाण रोखण्यात अपयश येत असल्यामुळे फ्रॅन्चायझी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.काय आहे फ्रॅन्चायझी?फ्रॅन्चायझी नेमणे म्हणजे खाजगीकरण नव्हे तर फ्रॅन्चायझी ही महावितरणचे प्रतिनिधी म्हणूनच काम करते. विजेची गळती कमी तसेच वीज बिल वसुली वाढल्यास भाविष्यात भारनियमनाचा प्रश्नच राहणार नाही,परिणामी ग्राहकांना लाभ होईल. यापूर्वी फ्रॅन्चायझी दिलेल्या ठिकाणी वितरण व वाणिज्य हानी घटून ग्राहकांना लाभ झाल्याचे भिवंडी येथील उदाहरण आहे. महावितरण प्रमाणेच फ्रॅन्चायझी मध्ये ग्राहकांचे हक्क अबाधित राहतील.

 

टॅग्स :Akola cityअकोला शहरmahavitaranमहावितरणAkola Vidhyut Bhavanअकोला विद्युत भवन