शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
4
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
5
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
6
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
7
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
8
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
9
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
10
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
11
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
12
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
13
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
14
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
15
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
16
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
17
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
18
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
19
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
20
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'

पावसाची प्रदीर्घ दडी, त्यात विजेचाही लपंडाव!

By admin | Updated: July 15, 2015 01:35 IST

विजेअभावी जिल्ह्यात सिंचन प्रभावित.

अकोला : पावसाळ्याच्या सुरुवातीला धो धो बरसलेल्या पावसाने एक महिना दडी दिली. पावसाने दडी दिल्याने कृषिपंपांचा वाढलेला वापर, हवामानातील बदलामुळे वाढलेल्या उष्णतेमुळे केवळ १५ दिवसांत विजेच्या मागणीत सुमारे ३000 ते ३५00 मे. वॉ. ने वाढ झाली आहे. दुसरीकडे निर्मितीतही घट आली आहे. परिणामी मागणी व पुरवठय़ात तफावत निर्माण झाल्याने अकोला जिल्ह्यासह राज्यात अघोषित भारनियमन सुरू झाले आहे. त्याचा फटका शेतकर्‍यांना बसला आहे. पावसाअभावी पिके सुकू लागल्याने ओलिताकडे वळलेल्या शेतकर्‍यांना वीजपुरवठय़ाअभावी पिकांना पाणीही देता येत नसल्याने शेतकरी आणखीच अडचण आला आहे. मागील काही दिवसांपासून पाऊस नसल्यामुळे कृषिपंपांचा वापर मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे १५ दिवसांपूर्वी राज्याची असलेली १३५00 ते १४000 मे. वॉ. विजेची मागणी अचानक वाढून ती १६000 ते १६,५00 मे. वॉ. एवढी झाली आहे. त्यामुळे राज्यात काही तास अघोषित भारनियमन करण्यात येत आहे. परळी येथील सर्व संच पाण्याअभावी बंद आहेत. महानिर्मितीकडून ५५00 मे.वॉ. अपेक्षित असलेली वीज केवळ ३८00 मे. वॉ. पर्यंंंत उपलब्ध होत आहे. तसेच पवन ऊज्रेतूनही १८00 ते २२00 मे. वॉ. अपेक्षित असलेली वीज केवळ १000 मे.वॉ. पर्यंंंत मिळत आहे. तिरोडा येथील अदानी पॉवरचा संच क्रमांक ४ (६६0 मे. वॉ.) आणि अमरावती येथील रतन इंडिया प्रकल्पातून अपेक्षित वीज उपलब्ध झाली नसल्यामुळे राज्यात प्रथमत: सकाळी ९.४५ वाजतापासून भारनियमनमुक्त असलेल्या जी- १, जी- २ आणि जी-३ या गटात भारनियमन करण्यात आले. केंद्रीय ग्रीडमधून वीज घेऊनही फ्रिक्वेन्सीमध्ये तफावत येत असल्याने आज इतरही गटात भारनियमन करण्यात आले. हे भारनियमन आटोक्यात आणण्यासाठी पॉवर एक्स्चेंजमधून १ हजार ते १२00 मे. वॉ. वीज काही तासांसाठी विकत घेण्यात आली. तसेच कोयना येथील २५0 मे.वॉ. चाही संच सुरू झाल्यामुळे विजेची उपलब्धता वाढल्याने सायंकाळपर्यंत सर्वच गटातील भारनियमन यामुळे कमी करण्यात आले.