शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Loksabha Election 2019 : ‘वंचित’ ला विजयाचा विश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 14:05 IST

अकोला: अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये २०१४ च्या निवडणुकीतील तेच प्रतिस्पर्धी पुन्हा नव्याने यावेळी समोर असले तरी यावेळची निवडणूक सर्वार्थाने वेगळी झाल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीच्या समर्थकांकडून होत आहे.

अकोला: अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये २०१४ च्या निवडणुकीतील तेच प्रतिस्पर्धी पुन्हा नव्याने यावेळी समोर असले तरी यावेळची निवडणूक सर्वार्थाने वेगळी झाल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीच्या समर्थकांकडून होत आहे. भारिप-बमसंऐवजी वंचित बहुजन आघाडी या नावाने अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक लढविल्यामुळे ओबीसींमधील सर्व घटकांमध्ये पक्षाचा विस्तार झाला आहे. त्यामुळे यावेळचा निकाल वेगळा असेल, असा विजयी विश्वास या पक्षाच्या समर्थकांना आहे.अकोला लोकसभा मतदारसंघाच्या गेल्या तीन निवडणुकींचा मागोवा घेतला तर अ‍ॅड. आंबेडकरांना मिळालेली मते ही चढत्या क्रमाने आहेत तर काँगे्रसच्या मतांमध्ये विभाजन झाल्याचे दिसत आहेत. काँग्रेसने मराठा उमेदवार दिल्यास मुस्लीम मते आंबेडकरांकडे वळतात हे हेरूनच काँग्रेसने २०१४ मध्ये हिदायत पटेल यांना उमेदवारी दिली. त्यामुळे अ‍ॅड. आंबेडकरांकडे वळलेल्या मुस्लीम मतांना बे्रक बसला व काँग्रेसने दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली. नेमकी हीच खेळी काँग्रेसने यावेळी खेळल्याने वंचित बहुजन आघाडीची कोंडी करण्याचा प्रयत्न झाला; मात्र झालेले मतदान पाहता वंचित बहुजन आघाडीच्या गोटात आपण कोंडी फोडण्यात यशस्वी झाल्याचा दावा केला जात आहे. ओसरलेली मोदी लाट, विद्यमान खासदारांच्या विरोधात असलेली सुप्त नाराजीची लाट अन् ओबींसीसह सर्वच लहान-मोठ्या समाजापर्यंत पोहोचत बाळासाहेबांनी वाढविलेली ताकद या बळावर सध्या विजयाचे सूत्र पक्षात मांडले जात आहे. .मोदी लाट, ओबीसींची बांधलेली मोट व अ‍ॅड. बाळासाहेबांना राज्यभरात मिळालेले समर्थन या आधारावर आम्ही विजयाचे सूत्र मांडत आहोत- प्रदीप वानखडेजिल्हाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी 

 

टॅग्स :Akolaअकोलाakola-pcअकोलाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक