शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

लोकमतचा प्रभाव: क्रीडांगणातील वाहनतळाची समस्या निकाली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 14:37 IST

पार्किंग व्यवस्था करण्यात आल्याचे सूचना फलक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने मैदानात लावण्यात आले आहेत.

अकोला: वसंत देसाई क्रीडांगण येथील वाहनतळाची पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. उद्या सोमवार, २७ मेपासून बॅडमिंटन, स्वीमिंग व बास्केटबॉलच्या खेळाडूंसाठी बहूद्देशीय हॉलच्या बाजूने आणि इतर सर्व क्रीडा प्रकाराच्या खेळाडू व नागरिकांसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयासमोरील बाजूने पार्किंग व्यवस्था करण्यात आल्याचे सूचना फलक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने मैदानात लावण्यात आले आहेत. सोमवारपासून या सूचनेची अंमलबजावणी होईल, अशी माहिती प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश कुळकर्णी यांनी ‘लोकमत’सोबत संवाद साधताना दिली.रविवारच्या अंकात ‘लोकमत’ने ‘वसंत देसाई क्रीडांगणाची ‘पार्किंग’ समस्या कायम!’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने गांर्भीयाने घेऊन खेळाडूंना पार्किंग संबंधित असलेली समस्येचे तत्काळ निरसन केले. वसंत देसाई क्रीडांगणावर मोठ्या प्रमाणात खेळाडू व नागरिक व्यायामासाठी येतात. क्रीडांगणात पार्किंग सुविधा नसल्याने क्रीडांगणाच्या पूर्वकडील बाजूला दुचाकी व चारचाकी वाहने उभे केल्या जाते. परिणामी, रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या वाहतुकीला अडथळा होत होता. मैदानातील आतील भागातही वाहने शिस्तीत लावल्या जात नसल्याने खेळाडूंना क्रीडांगणात प्रवेशासाठी अडथळा येत होता.क्रीडांगणाच्या पश्चिम व दक्षिणेकडील भागात अतिक्रमण झालेले आहे. यामुळे या दोन्ही बाजंूनी पार्किंग होऊ शकत नाही. शिवाय, मुख्य प्रवेशद्वारासमोर रात्री ट्रक व लक्झरी बस उभ्या राहतात. पूर्वेकडील बाजूने क्रीडांगणावर येणाºया लोकांच्या गाड्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजंूनी अस्ताव्यस्त स्थितीत उभ्या राहतात. परिणामी, बॅडमिंटन हॉल व जलतरण तलावाकडे जाणाऱ्यांना अडथळा निर्माण होते. यासाठी क्रीडा विभागाने आता खबरदारीचे पाऊल उचलले आहे. ८ मे रोजी दोन्ही छोट्या प्रवेशद्वारांवर एक सूचना लावावी की, ‘१५ मेपासून पार्किंग जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या बाजूने राहील’, असे खेळाडूंनी क्रीडा अधिकाºयांना सुचविले होते; मात्र एवढे असूनसुद्धा क्रीडा कार्यालयाने काहीच कारवाई केली नव्हती. याशिवाय बॅडमिंटन हॉल, तरणतलाव, बास्केटबॉल मैदान परिसरातील मोकळ्या जागेतही गाड्या लावल्या जातात. एखादी अप्रिय घटना घडल्यास अ‍ॅम्ब्युलन्सला आत येण्यासाठीसुद्धा जागा नाही. यासाठी मैदानात येणाºया लोकांसाठी पार्किंग दुसºया प्रवेशद्वाराने करावी, अशी मागणी खेळाडूंनी केली होती. खेळाडूंनी केलेल्या या मागणीची पूर्तता केली असून, सोमवारपासून अंमलबजावणी होणार आहे. यासाठी खेळाडू व नागरिकांनीही सहकार्य करणे अपेक्षित आहे.

 

 

टॅग्स :AkolaअकोलाVasant Desai Stadiumवसंत देसाई क्रीडांगण