शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : मतदारांची नावे गहाळ, ‘ईव्हीएम’ पडल्या बंद, घोळ काही थांबेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 15:07 IST

ईव्हीएम मशीन बंद पडल्यानंतर दोन-दोन तास पर्यायी व्यवस्था करू न शकणारे निवडणूक विभागाचे कामकाज संशयाच्या भोवºयात सापडले आहे.

अकोला: मतदारांची नावे यादीतून गहाळ होणे, जिवंत मतदारांना चक्क मयत दाखविणे, मयत उमेदवाराचे नाव बाद न करता त्यांच्या कुटुंबातील इतर मतदारांचे नाव बाद करणे, कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय किंवा दुरुस्तीसाठी सादर केलेल्या अर्जाशिवाय असंख्य मतदारांवर ‘डिलिट’चा शिक्का मारून त्यांना मतदानापासून वंचित ठेवण्याचे काम जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक विभागाने इमानेइतबारे पार पाडले. हा घोळ कमी म्हणून की काय, ईव्हीएम मशीन बंद पडल्यानंतर दोन-दोन तास पर्यायी व्यवस्था करू न शकणारे निवडणूक विभागाचे कामकाज संशयाच्या भोवºयात सापडले आहे. या प्रकारामुळे सर्वसामान्य मतदारांना प्रचंड मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागल्याचे चित्र गुरुवारी मतदानाच्या दिवशी दिसून आले.लोकसभेच्या दुसºया टप्प्यात होऊ घातलेल्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया कोणत्याही अडचणींशिवाय पार पडेल, असा आशावाद जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी व्यक्त केला होता. ज्या पद्धतीने निवडणूक विभागाने तयारीचा गाजावाजा केला होता, ती पाहता लोकसभा निवडणुकीचा हा उत्सव यशस्वी होईल, अशी अपेक्षा होती. झाले नेमके उलटेच. ऐन मतदानाच्या दिवशी शहरातच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्यातील असंख्य मतदारांना निवडणूक विभागाच्या हलगर्जीपणामुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला असून, अनेकांना मतदानापासून वंचित राहावे लागल्याचे चित्र समोर आले. ऐन मतदानाच्या दिवशी सर्वत्र उडालेला गोंधळ व घोळ पाहता निवडणूक विभागाचे कामकाज संशयाच्या भोवºयात सापडले आहे.मतदारांच्या मस्तकी ‘डिलिट’चा शिक्कामतदारांनी मतदान केंद्र गाठल्यावर मतदार यादीमध्ये त्यांच्या छायाचित्रावर ‘डिलिट’चा शिक्का मारला असल्याचे दिसून आले. या प्रकारामुळे मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले. मतदार जनजागृती मोहिमेत नवीन मतदारांचा समावेश करणे, मयत मतदारांची नावे बाद करणे तसेच पत्ता बदलण्यासाठी नागरिकांनी अर्ज सादर केल्यावरच ‘बीएलओं’नी दुरुस्त्या करणे क्रमप्राप्त होते. या ठिकाणी मतदारांनी कोणत्याही दुरुस्त्यांचे अर्ज सादर न करताही निवडणूक विभागाने परस्पर घोळ घातल्याचे समोर आले.

पळसो बढे येथील श्रीकृष्ण सिदाजी बढे (८८) मतदान कार्ड, आधार कार्ड घेऊन मतदान केंद्रावर गेले असता, यादीमध्ये ते मयत असल्याचे सांगत निवडणूक अधिकाऱ्यांनी बढे यांचा मतदानाचा अधिकार नाकारला. हा सर्व प्रकार खा. अ‍ॅड. संजय धोत्रे यांच्यासमक्ष घडला. श्रीकृष्ण बढे जिवंत असताना यादीत त्यांना मयत दाखविण्याचा प्रताप निवडणूक विभागाने केला कसा, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकakola-pcअकोलाAkolaअकोला