शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : निवडणूक प्रचारातून शेतकऱ्यांच्या समस्या गायब!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 12:53 IST

अकोला: अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रचारात शेतकऱ्यांच्या मुद्यांवर राजकीय पक्षांकडून कानाडोळा करण्यात येत असल्याने निवडणूक प्रचारातून शेतकऱ्यांच्या समस्या गायब झाल्याचे वास्तव आहे.

अकोला: अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रचारात शेतकऱ्यांच्या मुद्यांवर राजकीय पक्षांकडून कानाडोळा करण्यात येत असल्याने निवडणूक प्रचारातून शेतकऱ्यांच्या समस्या गायब झाल्याचे वास्तव आहे.अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी १८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीच्या जाहीर प्रचारात अद्यापही जोर नसला, तरी निवडणूक रिंगणातील उमेदवारांकडून मतदारसंघातील मतदारांशी संवाद साधत बैठका घेण्यात येत आहेत. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीत शेतकरी संकटात सापडला असताना, शेतकºयांच्या विविध समस्यांच्या विषयांवर मात्र कोणीही बोलत नाही. कर्जमाफी, दुष्काळी मदत, शेतकरी सन्मान निधी योजना, तूर खरेदीचे थकीत चुकारे यासह शेतकºयांच्या इतर प्रश्नांवर राजकीय पक्षांकडून कानाडोळा करण्यात येत आहे. निवडणुकीच्या प्रचारात शेतकºयांच्या प्रश्नांवर चर्चा होत नसल्याने, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातून शेतकºयांच्या समस्यांचा मुद्दा गायब झाल्याचे चित्र आहे.शेतकºयांच्या अशा आहेत समस्या!कर्जमाफी योजनेत कर्जमाफीसाठी जिल्ह्यातील १ लाख ३८ हजार ७३२ शेतकºयांनी आॅनलाइन अर्ज केले होते. त्यापैकी १ लाख ३१ हजार ३१० शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळाला असला, तरी उर्वरित शेतकरी अद्याप कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. दुष्काळग्रस्त सर्व शेतकºयांना मदतीच्या पूर्ण रकमेचा लाभ अद्याप मिळाला नाही. पीएम-किसान सन्मान निधी योजनेंतर्गत अर्ज केलेल्या जिल्ह्यातील सर्व शेतकºयांच्या खात्यात पहिल्या हप्त्याची रक्कम जमा झाली नाही. हमी दराने विकलेल्या तुरीचे चुकारे वेळेवर मिळत नाही. अशा अनेक समस्यांनी शेतकरी अडचणीत सापडला असताना, निवडणूक प्रचारात मात्र शेतकºयांच्या विविध प्रश्नांवर चर्चा होत नाही.लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात शेतकरी समस्यांच्या विषयावर कोणतीही चर्चा होत नाही. शेतकºयांच्या प्रश्नावर कोणताही राजकीय पक्ष बोलत नाही. त्यामुळे निवडणूक प्रचारात शेतकºयांच्या समस्यांचा विषय गायब झाल्याची परिस्थिती आहे.- शिवाजी भरणे,शेतकरी, रामगाव, ता. अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकakola-pcअकोला