शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : प्रचारासाठी अवघे धोत्रे कुटुंब सक्रिय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 14:05 IST

अकोला: लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात तब्बल चौथ्यांदा दंड थोपटून उभे असलेले विद्यमान खासदार तथा भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार अ‍ॅड. संजय धोत्रे यांची विजयाची शृंखला कायम ठेवण्यासाठी त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य सक्रिय झाल्याचे चित्र आहे.

अकोला: लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात तब्बल चौथ्यांदा दंड थोपटून उभे असलेले विद्यमान खासदार तथा भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार अ‍ॅड. संजय धोत्रे यांची विजयाची शृंखला कायम ठेवण्यासाठी त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य सक्रिय झाल्याचे चित्र आहे. कागदोपत्री ‘मॅनेजमेंट’ करण्यापुरतेच नव्हे तर प्रत्यक्षात मतदारांशी संपर्क व गाठीभेटी घेण्यावर त्यांच्या अर्धांगिनी सुहासिनीताई, मुलगा अनुप आणि स्नुषा समीक्षा अनुप धोत्रे यांचा भर असल्याचे दिसून येत आहे.भारतीय जनता पार्टीचे विद्यमान खासदार अ‍ॅड. संजय धोत्रे यांना पक्षाने चौथ्यांदा उमेदवारी बहाल केली आहे. २००४ मधील लोकसभा निवडणुकीपासून अ‍ॅड. धोत्रे यांची विजयाची शृंखला कायम आहे. उमेदवार कोणत्याही पक्षाचा असो कुटुंबातील सदस्यांकडून अपेक्षा उंचावलेल्या असतात. त्या अपेक्षांचे काही प्रमाणात का असेना, उमेदवारावर भावनिक दडपण राहतेच. साहजिकच अशावेळी निवडणुकीच्या कालावधीत जर संपूर्ण कुटुंबाने साथ दिली तर उमेदवाराचा उत्साह टिकून मानसिक आधार राहतो. या ठिकाणी हा उत्साह टिकवून ठेवण्यासोबतच प्रत्यक्षात प्रचार यंत्रणेत सहभागी होण्यासाठी विद्यमान खासदारांच्या कुटुंबातील सर्व सदस्य सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. यामध्ये खेड्यापाड्यात जाऊन मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क साधण्यावर कुटुंबातील सदस्यांनी लक्ष केंद्रित केल्याचे चित्र आहे.उमेदवार अ‍ॅड. संजय धोत्रेमागील २० वर्षांपासून राजकारणात सक्रिय सहभागी. १९९९ मध्ये मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात विजयी. २००४ पासून अकोला लोकसभा मतदारसंघात विजयाची शृंखला कायम. यंदा चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उभे असून, मृदुभाषी स्वभावासाठी प्रसिद्ध.सुहासिनीताई धोत्रेभारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या मार्गदर्शक पदावर कार्यरत. मागील चार महिन्यांपासून जिल्ह्याच्या ग्रामीण तसेच शहरी भागात जाऊन महिला मतदारांशी थेट संपर्क साधण्यावर भर. सकाळी ९ वाजता प्रचार सभा, कॉर्नर बैठकांसाठी रवाना झाल्यानंतर रात्री उशिरापर्यंत महिला मतदारांशी गाठीभेटी घेत आहेत.अनुप धोत्रेभारतीय जनता युवा मोर्चा कार्यकारिणीत सक्रिय सदस्य म्हणून सहभागी आहेत. अत्यंत विनम्र अशी ओळख असणाऱ्या अनुप यांची प्रचाराची हटके स्टाइल आहे. मित्र परिवार व भाजयुमोतील पदाधिकारी-कार्यकर्त्यांना सोबत घेऊन रिसोडसह सहा विधानसभा मतदारसंघातील मतदारांशी संपर्क, त्यांची प्रत्यक्षात भेट घेऊन विचारपूस करण्यावर भर आहे. 

 

टॅग्स :Akolaअकोलाakola-pcअकोलाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSanjay Dhotreसंजय धोत्रे