शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : युतीचे सूर बिघडलेलेच; आघाडीची अस्तित्वासाठी धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 14:46 IST

महापालिकेच्या निवडणुकीपासून या मतदारसंघात भाजप व शिवसेनेतील सूर बिघडले असून, काँग्रेस-राष्ट्रवादीची अस्तित्वासाठी धडपड सुरू असल्याचे चित्र आहे.

- आशिष गावंडे

अकोला: भाजपचे वर्चस्व असलेल्या अकोला पश्चिम मतदारसंघात शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग असून, त्याने वेळोवेळी हिंदुत्वाच्या अजेंड्यानुसार भाजपच्या पारड्यात मतांचे दान टाकल्याचे चित्र दिसून येते.मात्र महापालिकेच्या निवडणुकीपासून या मतदारसंघात भाजप व शिवसेनेतील सूर बिघडले असून, काँग्रेस-राष्ट्रवादीची अस्तित्वासाठी धडपड सुरू असल्याचे चित्र आहे. एकूणच परिस्थिती पाहता लोकसभा निवडणुकीत मताधिक्य टिकवण्याचे भाजपसमोर आव्हान आहे.लोकसभा मतदारसंघातील अकोला पश्चिम हा भाजपसाठी महत्त्वाचा मतदारसंघ मानला जातो. २५ वर्षांचा इतिहास पाहता या विधानसभा मतदारसंघावर भारतीय जनता पार्टीचे निर्विवाद वर्चस्व दिसून येते. गोवर्धन शर्मा या मतदारसंघाचे विद्यमान आमदार असून २०१४ मधील विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेसोबत युती नसली तरी त्यांना मिळालेले मताधिक्य पाहता भाजपची तटबंदी फार मजबूत असल्याचे लक्षात येते. शिवसेनेचीसुद्धा या मतदारसंघात खोलवर पाळेमुळे रुजल्याची परिस्थिती आहे. शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग पश्चिम मतदारसंघात दिसून येतो. २०१४ मधील निवडणुकीचा अपवाद वगळता या मतदारसंघातून भाजप-सेना युतीचे उमेदवार म्हणूनच आ. गोवर्धन शर्मा निवडणुकीला सामोरे गेले आहेत. त्यामुळे साहजिकच सेनेच्या मतदाराने भाजपच्या पारड्यात मत टाकले. यंदा लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेची पुन्हा युती झाली असली तरी २०१७ मधील मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीपासून भाजप-सेनेचे सूर जुळत नसल्याचे दिसून येते. भाजपकडून अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचा आरोप शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून केला जातो. लोकसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर शिवसेनेची ही नाराजी दूर करून मताधिक्य टिकवण्याचे भाजपसमोर आव्हान आहे.शिवसेनेला संपविण्याची खेळी!मनपाच्या निवडणुकीत पश्चिम मतदारसंघातून शिवसेनेला संपविण्याची खेळी भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून खेळण्यात आल्याचा सेनेच्या गोटातून आरोप होतो. त्यामध्ये तथ्यही असल्याचे दिसून येते. शिवसेनेच्या विरोधात तगडे उमेदवार देणे, त्यांना सर्व प्रकारची रसद पुरवणे, निधी वाटपातून वेळोवेळी डच्चू देणे, सेना नगरसेवकांच्या वाटेला गेलेल्या विकास कामांना खोडा घातल्या जात असल्याचा आरोप सेनेकडून होतो.

आघाडीसमोर अस्तिवाची लढाईअकोला पश्चिम मतदारसंघात २०१४ मधील निवडणुकीचा अपवाद वगळल्यास काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाणे पसंत केले. या दोन्ही पक्षांची वेळोवेळी आघाडी होत असली, तरी त्याला सुरुंग लावण्याचे काम आजवर भारिप-बहुजन महासंघाने केल्याचे दिसून येते. या मतदारसंघात भारिपच्या स्वतंत्र भूमिकेमुळे भाजपच्या विजयाचा मार्ग मोकळा होत असल्याचे चित्र आहे. यंदा काँग्रेस-राकाँची आघाडी झाल्यास भाजप-शिवसेना युतीसमोर त्यांची अस्तित्वाची लढाई पाहावयास मिळू शकते. 

असे रंगले होते राजकारण२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणूक लढले. या लढतीत आ. गोवर्धन शर्मा यांना ६६ हजार ९३४ मते मिळाली, तर सेनेच्या गुलाबराव गावंडे यांना १० हजार ८०० मते मिळाली होती. राष्ट्रवादीचे उमेदवार विजयराव देशमुख यांनी मुसंडी मारत २६ हजार ९८१ मते मिळविली. त्या तुलनेत काँग्रेसच्या उमेदवार उषा विरक यांना १० हजारांपेक्षा अधिक मते मिळाली होती. भारिप-बमसंचे उमेदवार आसिफ खान यांना २३ हजार ९२७ मते मिळाली होती. 

 

टॅग्स :Akolaअकोलाakola-pcअकोलाShiv SenaशिवसेनाBJPभाजपा