शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी बँकेच्या बैठकीत संचालकांमध्ये फ्रीस्टाईल; बाटल्यांची फेकाफेक, शिवीगाळ, आरोप-प्रत्यारोप
2
महिलेचे नाव वेगवेगळ्या एपिक नंबरसह, दुपारी ३ वाजता वेबसाईटवर होती, सहा वाजता गायब...; निवडणूक आयोग अनभिज्ञ...
3
माजी पालिका आयुक्तांची अटक बेकायदा; कोर्टाचा ईडीला दणका
4
Rain Alert: अवकाळीची शक्यता, १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट; कोणत्या दिवशी, कुठे कोसळणार...
5
आता शहरी नक्षलवादाविरुद्ध लढा : मुख्यमंत्री फडणवीस
6
सोनं वाढतंय, आणखी वाढीच्या अपेक्षेने गुंतवणूकदार टाकू लागले सोन्यात पैसा
7
‘अरे हीरो, क्या हाल है भाई?’, रोहित-गिल यांनी मारली मिठी
8
मुंबईकरांचा संकटमोचक आला धावून...; रणजी करंडक : सिद्धेशच्या शतकाने मुंबईचे पुनरागमन
9
सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोची विश्वविक्रमी ‘किक’; विश्वचषक पात्रता फेरीत केले सर्वाधिक गोल
10
यशस्वी जैस्वालचे पुन्हा अव्वल पाचमध्ये आगमन
11
वर्चस्व गाजवूनही पाकचे एका गुणावर समाधान; पावसाच्या व्यत्ययामुळे इंग्लंडचा पराभव टळला
12
‘राष्ट्रकुल’चे यजमानपद अहमदाबादला; कार्यकारी मंडळाची शिफारस
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

लोकअदालतीत एक हजारावर तक्रारींमध्ये समेट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 12:44 IST

समेट घडवून आणलेल्या प्रकरणांमध्ये दिवाणी, फौजदारी, मोटार वाहन अपघात, धनादेश अनादर प्रकरणाचा समावेश होता.

ठळक मुद्दे६ हजार ९५० प्रकरणे राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. यापैकी १ हजार ८९ प्रकरणात समेट घडवून आणण्यात आला. १० कोटी ८० लाख ४२ हजार ६३७ रुपये वसूल करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबईच्या निर्देशानुसार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वाय.जी. खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनाखाली १४ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या लोकअदालतीमध्ये १ हजार ८९ प्रकरणाच्या तक्रारींवर समेट घडवून आणण्यात आला. या प्रकरणांचा निपटारा करताना, १० कोटी ८० हजार, ४२ हजार ६३७ रुपयांची विक्रमी वसुली करण्यात आली.जिल्ह्यातील सर्व दिवाणी व फौजदारी, कामगार न्यायालय, सहकार न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, औद्योगिक न्यायालय येथे १४ डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. न्यायालयात प्रलंबित प्रकरणांपैकी एकूण ६ हजार ९५० प्रकरणे राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. यापैकी १ हजार ८९ प्रकरणात समेट घडवून आणण्यात आला. समेट घडवून आणलेल्या प्रकरणांमध्ये दिवाणी, फौजदारी, मोटार वाहन अपघात, धनादेश अनादर प्रकरणाचा समावेश होता. या १ हजार ८९ प्रकरणामध्ये १० कोटी ८० लाख ४२ हजार ६३७ रुपये वसूल करण्यात आले.याकरिता सर्व पॅनलवर पॅनल सदस्य म्हणून न्यायाधीश, अधिवक्ता व समाजसेवक यांनी काम पाहिले. लोकअदालतीमध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष व प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वाय.जी. खोब्रागडे, जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. के. भालेराव यांचे मार्गदर्शन लाभले. लोकअदालतीच्या यशस्वीतेसाठी विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव व न्यायाधीश एस. एस. बोस, जिल्हा न्यायालयाचे प्रबंधक ए.एस. लव्हाळे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अधीक्षक सज्जाद अहमद, श्रीहरी टाकळीकर, वरिष्ठ लिपिक, व्ही.आर. पोहरे, कुणाल पांडे, कनिष्ठ लिपिक व मो. शरीफ, शाहबाज खान आदींनी प्रयत्न केले. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाCourtन्यायालय