शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाउन : साठ परप्रांतीय मनपाच्या निवाऱ्यात आश्रयाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 11:01 IST

निवारा केंद्रांमध्ये परराज्यातील नागरिकांचा मुक्काम वाढला असून, त्यांना घरी जाण्याची ओढ लागली असल्याची भावना मध्य प्रदेशातील व्यक्तीने बोलून दाखविली.

- आशिष गावंडे लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी केंद्र सरकारने पहिल्या टप्प्यात १४ एप्रिलपर्यंत ‘लॉकडाउन’ घोषित केला होता. आता हा कालावधी ३ मेपर्यंत वाढविण्यात आला. यामुळे मनपाने उघडलेल्या दोन निवारा केंद्रांमध्ये परराज्यातील नागरिकांचा मुक्काम वाढला असून, त्यांना घरी जाण्याची ओढ लागली असल्याची भावना मध्य प्रदेशातील व्यक्तीने बोलून दाखविली.कोरोना विषाणूचा संसर्ग देशभरात पसरत असल्याचे पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २३ मार्च रोजी देशात १४ एप्रिलपर्यंत टाळेबंदीची घोषणा केली होती. या निर्णयामुळे उद्योग-व्यवसाय बंद पडल्याने हातावर पोट असणाºया मजूर वर्गाने आपापल्या गावी परत जाण्याची भूमिका घेतली. प्रवासाकरिता वाहनांची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे अशा मजूर वर्गाने चक्क पायी चालत त्यांची गावे गाठण्याचा निर्णय घेतला; परंतु कोरोना हा संसर्गजन्य विषाणू असल्यामुळे त्याचा प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेता अशा नागरिकांसाठी जिल्हा प्रशासनाने तसेच महापालिका, नगरपालिका, नगर परिषद यांनी त्यांच्या स्तरावर निवारा केंद्र उघडण्याचे निर्देश शासनाने दिले. त्या पृष्ठभूमीवर महापालिका प्रशासनाने शहरात दोन ठिकाणी निवारा केंदे्र उघडली आहेत.यामध्ये अकोट फैलस्थित मनपा शाळा क्रमांक ६ च्या आवारात व रामदासपेठमधील मनपा शाळा क्रमांक ७ मध्ये निवारा केंद्र उघडण्यात आले आहे. या दोन्ही ठिकाणी उघडण्यात आलेल्या निवारा केंद्रांमध्ये २८० पेक्षा जास्त नागरिक मुक्कामी आहेत. या नागरिकांच्या जेवणाची, झोपण्याची तसेच आरोग्य तपासणीची सुविधा मनपा प्रशासनाने उपलब्ध करून दिली आहे.

दर चार दिवसांआड आरोग्य तपासणीमहापालिकेच्या निवारा केंद्रात मुक्कामी असणाºया महिला, पुरुष व लहान मुलांच्या आरोग्याची दर चार दिवसांनी आरोग्य तपासणी केली जाते. आंघोळीसाठी टॉवेल, साबण आदी साहित्य उपलब्ध करून देण्यात आल्याने काही व्यक्तींनी हा मुक्काम वाढावा, अशी भावना व्यक्त केली.मनपाकडून सुरक्षारक्षक तैनातमहापालिकेने निवारा केंद्राच्या ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षेसाठी तसेच आरोग्याची समस्या निर्माण झाल्यास त्याची माहिती प्रशासनाला तातडीने व्हावी, याकरिता सुरक्षारक्षकांची नेमणूक केली आहे.

इथे सुविधा आहेत; पण घरी जाण्याची चिंता आहे!महापालिकेने जिल्हा न्यायालयासमोरील मनपा मराठी मुलांची शाळा क्रमांक सातमध्ये शहरातील बेघर तसेच बाहेरगावच्या नागरिकांसाठी निवारा केंद्र उघडले. या ठिकाणी १९८ नागरिक मुक्कामी आहेत. यापैकी सात व्यक्ती परराज्यातील असून, निवारा केंद्रामध्ये सर्व सुविधा असल्या तरी घरी जाण्याची चिंता सतावत असल्याची भावना मध्य प्रदेशातील हातमजुरी करणाºया तीन कुटुंबीयांनी बोलताना व्यक्त केली.

 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या