शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमुळे टरबूज शेतीला आर्थिक फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:14 IST

मूर्तिजापूर : गत वर्षापासून सर्वत्र कोरोना महामारीचा कहर सुरू आहे. कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले. याचा कृषी ...

मूर्तिजापूर : गत वर्षापासून सर्वत्र कोरोना महामारीचा कहर सुरू आहे. कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले. याचा कृषी क्षेत्रावर दूरगामी परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. तालुक्यात इतर शेती व्यवसायांसोबतच टरबूज शेतीला प्रचंड आर्थिक फटका बसला आहे.

तालुक्यात लॉकडाऊनमुळे टरबूज उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत.

तालुक्यातील धोत्रा शिंदे या गावातील शेतकरी दरवर्षी शेतात विविध प्रयोग करून काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नात असतात. इथल्या काही शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या तब्बल आठ एकर क्षेत्रावर यावर्षी टरबूज लागवडीचा यशस्वी प्रयोग केला. पिकाची लागवड, देखरेख, मशागतीवर नऊ लाख रुपये खर्चही केला. मात्र, ऐनवेळी लागलेल्या लॉकडाऊनमुळे उत्पादित झालेल्या मालाला योग्य भाव व बाजारपेठ मिळाली नसल्याने लागवडीसाठी लागलेला लाखो रुपयांचा खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना दरवर्षी टरबूज शेतीतून बऱ्यापैकी आर्थिक फायदा होतो. परंतु, यावर्षी विक्री न झाल्याने संपूर्ण शेतीतील टरबुजाचे पीकच वाया गेले आहे. परिणामी शेतीला लागलेला खर्चसुद्धा निघाला नसल्यामुळे खरिपाची पेरणीपूर्व मशागत व पेरणी कशी करावी, हा प्रश्न उभा ठाकला आहे. झालेल्या नुकसानीबाबत शासनाकडून मदतीची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

फोटो:

मी थेट टरबूज व खरबूज रोपे मागवून त्याची चार एकर शेतीत लागवड केली. त्यासाठी अडीच लाख रुपये खर्च झाला. परंतु, लॉकडाऊनमुळे बाजारात टरबूज व खरबूज फळांना मागणी नसल्याने प्रचंड आर्थिक फटका बसला आहे.

-शिरीष देशमुख

टरबूज उत्पादक शेतकरी, सिरसो

लॉकडाऊन असल्याने व्यापारी माल घ्यायला तयार नाही. टरबूज शेतीतून उत्पादन झाले. परंतु, लॉकडाऊनमुळे टरबुजाची विक्री करता आली नाही. यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी आमची मागणी आहे.

-शेख समीर

टरबूज उत्पादक शेतकरी, धोत्रा शिंदे

मार्चमध्ये दोन एकर शेतात टरबूज लागवड केली. त्यासाठी दीड लाख रुपये खर्च झाला. लॉकडाऊनमुळे व्यापारी माल घेत नसल्याने व बाजारपेठ बंद असल्याने संपूर्ण टरबूज फेकून देण्याची किंवा फुकट वाटण्याची शेतकऱ्यावर वेळ आली आहे.

-शराफत अली

टरबूज उत्पादक शेतकरी, धोत्रा शिंदे