शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Lockdown Efect : खाद्यपदार्थ विक्री ठप्प; एक कोटीचा फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 10:39 IST

जिल्ह्यातील तब्बल साडेतीन ते चार हजार किरकोळ खाद्यपदार्थ व्यावसायिकांची दिवसाची सरासरी ८० लाख ते एक कोटी रुपयांची दैनंदिन उलाढाल ठप्प झाली आहे.

- सचिन राऊत  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : ‘कोरोना’ विषाणूचा सामुदायिक संसर्ग टाळण्याकरिता २४ मार्चपासून ‘लॉकडाउन’ तसेच संचारबंदी असल्यामुळे हातगाडीवर किरकोळ खाद्यपदार्थ विकणारे जिल्ह्यातील तब्बल साडेतीन ते चार हजार किरकोळ खाद्यपदार्थ व्यावसायिकांची दिवसाची सरासरी ८० लाख ते एक कोटी रुपयांची दैनंदिन उलाढाल ठप्प झाली आहे. या किरकोळ खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांवर या कालावधीत उपासमारीची वेळ आली आहे.शहरात किरकोळ खाद्यपदार्थ विक्री करणाºया या व्यावसायिकांची समोसा, कचोरी, रगडा पेटीस, आलू पुरी, मुंगवडा, दहीवडा तसेच आलूवडा विक्रीची रस्त्यावर दुकाने आहेत. अशाच प्रकारचे खाद्यपदार्थ विक्रीच्या हातगाड्या, छोटेखानी हॉटेलही शहरात मोठ्या प्रमाणात आहेत. यासोबतच ग्रामीण भागातील प्रत्येक गावात तसेच मोठ्या खेड्यांमध्येही खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांची संख्या चांगलीच असल्याने त्यांची दुकाने ‘लॉकडाउन’मुळे बंद करण्यात आली आहेत.त्यामुळे किरकोळ खाद्यपदार्थ विक्री करणाºया या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली असून, त्यांनी दुसरे रोजंदारीची कामे सुरू केली आहेत. शहरात फुटपाथवर अतिक्रमण करून व्यवसाय करणाºयांची संख्या यामध्ये अधिक आहे. सदर व्यवसायातून मिळणाºया उत्पन्नाच्या भरवशावर हजारो व्यावसायिकांचा उदरनिर्वाह चालत असल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले; मात्र ‘लॉकडाउन’पासून त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.कर्जाचा हप्ता आणि उसनवारीची चिंताकिरकोळ व्यावसायिकांमध्ये कुणाला बँकेची, बचत गटाची तसेच मायक्रो फायनान्सच्या कर्जाची किस्त भरायची आहे. अशाच प्रकारे मुलीचे लग्न, मुला-मुलीच्या शाळेचे शुल्क भरण्याची चिंता सतावत आहे. एलआयसी पॉलिसीचा हप्ता भरायचा बाकी असून, तर तातडीची वैद्यकीय सेवा घ्यावी लागते. अनेक किरकोळ व्यावसायिक भाड्याच्या घरात राहतात. त्यांच्यापुढे भाडे चुकविण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे.एक किरकोळ व्यावसायिक दररोज किमान दोन ते पाच हजार रुपयांपर्यंत व्यवसाय करतो. त्यामुळे आमच्यासारख्या किरकोळ व्यावसायिकांची जिल्ह्यात ८० लाख ते एक कोटी रुपयांची दैनंदिन उलाढाल असते. त्यामुळे अशा व्यावसायिकांचे ‘लॉकडाउन’च्या कालावधीत मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.- सचिन गावंडे,किरकोळ खाद्यपदार्थ विक्रेता, कौलखेड, अकोला.

रोज कमवाल तर रोज दोन वेळचे जेवण मिळेल, अशी परिस्थिती काही किरकोळ खाद्यपदार्थ व्यावसायिकांची आहे. अशी परिस्थिती असलेल्या व्यावसायिकांना व्यवसायाची गाडी रुळावर आणण्यासाठी ३ मेपर्यंत वाट बघावी लागणार आहे. त्यामुळे या किरकोळ व्यावसायिकांना दोन वेळच्या जेवणाची मोठी अडचण निर्माण झाल्याने त्यांनी मिळेल ते मजुरीचे काम सुरू केले आहे.- आकाश ठाकूर,खाद्यपदार्थ विक्रेता गांधी चौक अकोला.

जीवनावश्यक वस्तू वगळता इतर कुठल्याही व्यवसायास संचारबंदीत प्रतिबंध करण्यात आला आहे. त्याकारणाने २० दिवसांहून अधिक काळासाठी आपला व्यवसाय बंद ठेवण्याची वेळ आली. अजून किमान दोन आठवडे तरी त्यांना व्यवसाय सुरू करता येणार नाही. त्यामुळे आता चरितार्थ कसा चालवायचा, असा प्रश्न आहे.- निखिल भाकरे,खाद्यपदार्थ विक्रेता, दुर्गा चौक अकोला.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या