शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

Lockdown Efect : लाखो क्विंटल कापूस शेतकऱ्यांकडे पडून!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 17:16 IST

खेडा खरेदी बंद झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

ठळक मुद्देशासनाने कापसाला पाच हजार पाचशे रुपये हमीदर जाहीर केले. सीसीआयने ८४ लाख क्विंटल कापसाची खरेदी केली. शेतमाल विकता येत नसल्याने शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत सापडला आहे.

अकोला: कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशात ‘लॉकडाउन’ घोषित करण्यात आले आहे. यामुळे उद्योगासह शेतमाल विक्रीकर यावर मोठा परिणाम झाला आहे. लाखो क्विंटल कापूस घरीच पडून आहे. खेडा खरेदी बंद झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. राज्यात कापसाचे क्षेत्र चाळीस लाख हेक्टरवर आहे. गतवर्षीच्या खरीप हंगामात जवळपास ४२ लाख हेक्टरवर शेतकऱ्यांनी कापूस पेरणी केली. सुरुवातीला पाऊस लांबल्याने पेरणीला विलंब झाला. जुलैमध्ये पाऊस पडल्यानंतर शेतकºयांनी पेरणी केली; परंतु पीक वाढीच्या अवस्थेत सतत पाऊस सुरू होता. त्याचा परिणाम काहीअंशी कापूस उत्पादनावर झाला. असे असले तरी काही भागात चांगले पीक आले. शासनाने कापसाला पाच हजार पाचशे रुपये हमीदर जाहीर केले. महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघ आणि भारतीय (सीसीआय) कापूस महामंडळाने राज्यात कमी दराने कापूस खरेदी सुरू केली. पणन महासंघाचे यावर्षी जवळपास ५२ लाख क्विंटल कापूस खरेदी केला. तसेच सीसीआयने ८४ लाख क्विंटल कापसाची खरेदी केली. गतवर्षी पावसाळा लांबल्याने शेतकºयांनी उशिरापर्यंत म्हणजे मार्च महिन्यापर्यंत कापूस वेचणी केली. त्यामुळे शेतकºयांकडे आजमितीस ६५ ते ७० लाख क्विंटल कापूस पडून आहे. देशातील ‘लॉकडाउन’मुळे जीवनावश्यक वस्तू वगळता इतर शेतमाल विकता येत नसल्याने कापूस उत्पादक शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत सापडला आहे. दरवर्षी कापूस खरेदीसाठी व्यापारी गावा-गावांत जातात, याला खेडा खरेदी पद्धत म्हणतात. यावर्षी खेडा खरेदी शक्य नाही. त्यामुळे व्यापारी गावात जात नाहीत. त्याचाही परिणाम कापूस विक्रीवर झाला आहे.या अडचणीत सापडलेल्या कापूस उत्पादक शेतकºयांना दिलासा देण्यासाठी शासनाने टप्प्या-टप्प्याने कापूस खरेदी करावी, अशी मागणी शेतकºयांकडून केली जात आहे.राज्यात कापसाचे अर्धे क्षेत्र विदर्भात आहे. विदर्भात अल्पभूधारक शेतकºयांच्या प्रमाण हे ७० टक्­क्­यांच्यावर आहे. सुरुवातीला यातील काही शेतकºयांनी कापूस विकला असला तरी अनेक शेतकºयांकडे आणखी कापूस घरी आहे. येथे कोरडवाहू शेतीचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळेच या भागातील सर्व पिके पावसावर अवलंबून आहेत. म्हणूनच येथील शेतकरी कापूस सोयाबीनसारखी पिके घेतात; परंतु यावर्षी कोरोनामुळे खरेदी बंद असल्याने शेतकरी अडचणीत सापडला असून, शासनाने तातडीने यांना मदत करावी, अशी मागणीही शेतकरी नेत्यांनी केली आहे.

 शेतकºयांकडे कापूस आहे; परंतु कोरोनामुळे खरेदी केंद्र बंद आहेत. १४ एप्रिलपर्यंत ‘लॉकडाउन’ आहे. त्यामुळे शासन पुढे काय निर्णय घेणार, यावर अवलंबून आहे. ‘लॉकडाउन’ वाढविला तर शेतकºयांचा शेतमाल खरेदी करण्यासाठी उपाययोजना महत्त्वाच्या ठरणार आहेत. याकडे आमचे लक्ष लागले आहे.- मनोज तायडे,शेतकरी नेते,अकोला.

 

टॅग्स :agricultureशेतीcottonकापूसFarmerशेतकरी