शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हापापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
3
बलुचिस्तानात मोठा खेला...! सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग; भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला
4
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
5
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
6
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
7
Sita Navami 2025: संततीप्राप्तीसाठी सीता नवमीचे व्रत कसे व कधी करावे ते जाणून घ्या!
8
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
9
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
10
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
11
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
12
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
13
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
14
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण
15
"...तर पाकिस्तान हल्ला करेल!"; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची भारताला पोकळ धमकी
16
Tarot Card: 'पेराल ते उगवेल' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
17
गर्लफ्रेंडसोबत चायनीज खाताना आईने लेकाला रंगेहाथ पकडलं; रस्त्यात चपलेने मारलं, धू-धू धुतलं
18
'या' कंपनीनं लाँच केला १८० दिवसांचा प्लान; SonyLIV सारख्या OTT चं मिळणार सबस्क्रिप्शन, काय आहे खास?
19
Leopard in Marathi: परीकडे बघून राधा अन् समृद्धी हसली; तिघींची गट्टी जमली
20
क्रिकेटवेडी, बोल्ड फोटो अन् शुबमनसोबत रिलेशनशीपची चर्चा; अवनीत कौर नेमकी आहे तरी कोण?

लॉकडाऊनचा शेवगा शेतीला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 11:01 IST

Lockdown afected drumstick farm ३,५०० ते ४,००० रुपये प्रति क्विंटलला विकला जाणारा शेवगा आता १,५०० ते २,००० प्रति क्विंटल दराने विकला जात आहे.

अकोला : कोरोनाचा कहर, लॉकडाऊनची स्थिती, पुरवठा अधिक तर मागणीत घट, या कारणांमुळे शेवग्याचे दर गडगडले. ३,५०० ते ४,००० रुपये प्रति क्विंटलला विकला जाणारा शेवगा आता १,५०० ते २,००० प्रति क्विंटल दराने विकला जात आहे. त्यामुळे शेवगा उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

वातावरणात अवेळी होणारा बदल, भावात होणारी चढ-उतार, यामुळे पारंपरिक पिकांना फाटा देत, शेतकरी प्रयोगशिलतेकडे वाटचाल करीत आहे. वाढत्या सिंचन क्षेत्राबरोबर फुलशेती, फळबागा, विदेशी भाजीपाला अशा विविध पिकांची लागवड शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. मजुरी, उत्पादन खर्च, दर यांचा विचार करता कापूस किंवा अन्य पिकांच्या तुलनेत शेवगा पीक शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे. शेवग्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात व त्याचे सेवन आरोग्यासाठी लाभदायी ठरते. योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर अनेक शेतकरी शेवगा शेतीकडे वळले आहे. जिल्ह्यातील शेवगा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अकोला, खामगाव ही बाजारपेठ सोईस्कर ठरते. व्यापाऱ्यांकडून चांगला भाव मिळत असल्याने, शेतकरी माल बाजार समितीत न घेऊन जाता व्यापाऱ्यांना विकून मोकळे होतात. लॉकडाऊनच्या काळात शेवग्याची आवक वाढली आहे. याउलट मागणीत घट झाली. परिणामी, शेवगा उत्पादक शेतकऱ्यांना याचा फटका बसत आहे. दरवर्षी शेतकऱ्याचे अर्थकारण उंचावणारी शेवगा शेती दुसऱ्या लॉकडाऊनपासून अडचणीची ठरू लागली आहे. त्यामुळे शेवगा उत्पादकांना कमी भावाने आपला माल विकावा लागत आहे.

 

शेवग्याची उचल कमी

लॉकडाऊन लागल्यामुळे खेड्यापाड्यातील आठवडी बाजार बंद आहे. त्यामुळे शेवग्याच्या मालाची उचल कमी होत आहे. सोबतच आवकही वाढली. सद्यस्थितीत शेवग्याचे दर कमी झाल्याचे शहरातील व्यापाऱ्यांनी सांगितले.

 

तीन एकर शेतात शेवगा शेती केली आहे. सुरुवातीला ३,५०० ते ४,००० रुपये प्रति क्विंटलने शेवगा विकला. मात्र, आता कमी भावात विकावे लागत आहे.

नीलेश टिकार, शेतकरी, कोलोरी

 

लॉकडाऊन आधीचे भाव

३,५०० ते ४,०००

लॉकडाऊननंतरचे भाव

१,५०० ते २,०००

व्यापाऱ्यांकडे आवक

५ ते ७ क्विंटल

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी