शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघासाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 14:36 IST

भाजपने शहरी भागातील निदान अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघावर पाणी सोडावे, अशी अपेक्षा शिवसेनेकडून व्यक्त केली जात आहे.

- आशिष गावंडे

अकोला: मागील पंचवीस वर्षांपासून अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघात भक्कमपणे पाय रोवणाऱ्या भारतीय जनता पार्टीला लढत देण्यासाठी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बाह्या वर खोचल्याचे चित्र आहे, तर जागा वाटपादरम्यान भाजपने शहरी भागातील निदान अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघावर पाणी सोडावे, अशी अपेक्षा शिवसेनेकडून व्यक्त केली जात आहे. तर हा मतदार संघ ताब्यात घेण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या इच्छुकांमध्ये जोरदार रस्सीखेच रंगल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.येत्या आॅक्टोबर महिन्यांत होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षातील इच्छुकांच्या अपेक्षांना धुमारे फुटले आहेत. १९९५ मध्ये अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघातून आमदार गोवर्धन शर्मा यांनी विजयाची दमदार ‘एन्ट्री’मारली ती आजतागायत कायम आहे. आ. शर्मा सातत्याने विजयी होत असल्यामुळे या मतदार संघावर भाजपचा निर्विवाद वरचष्मा असल्याचे दिसून येते. या मतदार संघात मजबूत तटबंदी असलेल्या भाजपला किमान एकदा तरी धोबीपछाड देण्याची इच्छा मनी बाळगून असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधील इच्छुक तयारीला लागले आहेत. या धामधुमीतही पक्षाकडून विजयी होण्यापेक्षा एकमेकांची जिरवण्यात धन्यता मानणाऱ्यांनीही तिकीटासाठी पक्षाकडे रेटा लावून धरल्याचे चित्र समोर येत आहे. दुसरीकडे जागा वाटपादरम्यान हा मतदार संघ शिवसेनेच्या वाट्याला यावा, अशी सेनेतील इच्छुकांची अपेक्षा आहे.मतदार संघ न सोडण्याची काँग्रेसची तयारी२०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसने विजयराव देशमुख यांना तिकीट नाकारल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली. त्यावेळी राज्यातही काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी न झाल्यामुळे काँग्रेसने या मतदार संघातून उषा विरक यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत राकाँच्या विजयराव देशमुख यांना २६ हजार ९८१ तसेच काँग्रेसच्या उषा विरक यांना जेमतेम १० हजार मतांवर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे यंदाही हा मतदार संघ राष्ट्रवादीकडेच राहावा,असा स्थानिक नेत्यांचा आग्रह आहे. तर हा मतदार संघ राष्ट्रवादीला न देता काँग्रेसकडे कायम ठेवण्याचा पक्षातील नेत्यांचा रेटा आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाPoliticsराजकारण