शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेच्या शेगावातील जमिनीवर घेतले खासगी व्यक् तींनी कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 02:12 IST

अकोला : जिल्हा परिषदेच्या मालकीच्या शेगावातील ८३ आर  जमिनीवर अतिक्रमण करण्यासोबतच ती तारण ठेवून कर्ज घे तल्याचाही प्रकार उघड झाला आहे. पुसद अर्बन बँकेच्या  खामगाव शाखा व्यवस्थापकाने दिलेल्या पत्रानंतर जिल्हा  परिषदेने शेगाव येथील मे. बालाजी असोसिएट्सच्या तीन  भागीदारांना नोटीस बजावत अतिक्रमण काढण्याचे बजावले  आहे. विशेष म्हणजे, ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानंतर  बँकेने जिल्हा परिषदेला पत्र पाठविले.

ठळक मुद्देपुसद अर्बन बँकेच्या खामगाव शाखेला आली जागसंबंधितांना बजावल्या नोटीस 

सदानंद सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हा परिषदेच्या मालकीच्या शेगावातील ८३ आर  जमिनीवर अतिक्रमण करण्यासोबतच ती तारण ठेवून कर्ज घे तल्याचाही प्रकार उघड झाला आहे. पुसद अर्बन बँकेच्या  खामगाव शाखा व्यवस्थापकाने दिलेल्या पत्रानंतर जिल्हा  परिषदेने शेगाव येथील मे. बालाजी असोसिएट्सच्या तीन  भागीदारांना नोटीस बजावत अतिक्रमण काढण्याचे बजावले  आहे. विशेष म्हणजे, ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानंतर  बँकेने जिल्हा परिषदेला पत्र पाठविले.जिल्हा परिषदेच्या मालकीची जमीन खामगाव रोडवर असल्याचे  शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी अर्थसंकल्पीय  सभेत सांगितले होते. बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी शोध घेतला. सर्व्हे  क्रमांक ३४३ मधील एकूण क्षेत्रात ८३ आरचा पोटहिस्सा जिल्हा  कौन्सिल अकोलाच्या नावे आहे. त्याच्या आजूबाजूने मोठय़ा  प्रमाणात बांधकामे करण्यात आली आहेत. त्या जागेची च तु:सीमा आणि सीमांकन करून देण्यासाठी भूमिअभिलेख,  तहसीलदार यांना पत्र पाठविले; मात्र दाद मिळाली नाही. सर्व्हे क्रमांकाच्या नकाशानुसार, खामगाव रस्त्यालगतचा हिस्सा  जिल्हा परिषदेच्या मालकीचा आहे, तर त्यामागे इतरांचे  पोटहिस्से आहेत; मात्र जिल्हा परिषदेच्या हिश्शात रस्त्यालगत  मोठय़ा इमारतींचे बांधकाम झाले आहे. खुली जागा त्या इमार तीच्या मागे सोडण्यात आली आहे., हे विशेष. 

जिल्हा परिषदेने दिली बांधकाम पाडण्याची नोटीसबँकेच्या पत्रातून या जागेवर अतिक्रमण करून बांधकाम होत  असल्याचे समजताच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी  अधिकारी एस. रामामूर्ती यांनी तीनही भागीदारांना २५ सप्टेंबर  रोजी नोटीस बजावली. त्यामध्ये सुरू असलेले बांधकाम त्वरित  थांबवा, सोबतच अतिक्रमणाच्या जागेवर केलेले बांधकाम आठ  दिवसांत पाडून टाकण्याचे म्हटले आहे. या प्रकाराने खडबडून  जागे झालेल्या बँकेने जागेच्या प्रत्यक्ष मोजणीच्या वेळी बँकेलाही  नोटीस मिळावी, अशी मागणी पत्रातून केली आहे. 

जागेवर हॉटेलचे बांधकामखामगाव रोडवर मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जागेवर सध्या  काही बिल्डर्सकडून हॉटेलचे बांधकाम सुरू आहे. या प्रकाराला  पुसद अर्बन को-ऑप. बँकेने जिल्हा परिषदेला पाठविलेल्या  पत्रातून दुजोरा मिळाला. बँकेच्या पत्रात जिल्हा परिषदेने नमूद  केलेल्या विवरणातील भूमापन क्रमांक ३४३। ४ अ मधील ८१  आर जमिनीवर शेगाव येथील मे. बालाजी असोसिएट्स या  भागीदारी फर्मला कर्ज दिल्याचे म्हटले आहे. त्यासाठी बँकेने  तीन भागीदारांसोबत जमिनीचे गहाणखत केले आहे. 

बालाजी असोसिएट्सचे भागीदारपुसद अर्बन बँकेकडे जमीन तारण ठेवून कर्ज घेताना गहाणखत  करून देणार्‍यांमध्ये राजेश मदनमोहन मुना, संजय भगवानदास  नागपाल दोघेही रा. धानुका ले-आउट रोड शेगाव, मीनाक्षी  रामविजय बुरूंगले, धनगर फैल शेगाव यांचा समावेश आहे, तर  बँकेकडून प्रभारी व्यवस्थापक विजय खांदवे यांची त्यावर  स्वाक्षरी आहे. 

शेगावातील जागा ताब्यात घेण्यासाठी जिल्हा परिषदेची  कार्यवाही सुरू आहे. तहसीलदारानंतर बुलडाणा जिल्हाधिकारी  यांना प्रकरण सादर केले जाईल.- एम.जी. वाठ, कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद.