शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय भूखंडावरील दोन कोटींच्या कर्ज प्रकरणात घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 14:30 IST

कर्जासाठी दिलेला सर्च रिपोर्टही संशयाच्या घेºयात असून, प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यास आणखी काही कर्ज प्रकरणांमध्ये असाच घोळ समोर येण्याची शक्यता आहे.

अकोला: शास्त्री नगर परिसरातील शासनाच्या मालकीच्या १० कोटी रुपयांच्या भूखंडाचे महसूल व भूमी अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने बनावट दस्तावेज तयार करीत यावर तब्बल दोन कोटी रुपयांचे कर्ज घेण्यात आले असून, यामध्ये बँकेनेच दस्तावेजांची योग्य तपासणी न करताच तसेच कर्ज वाटप केल्याची माहिती समोर आली आहे. या कर्जासाठी दिलेला सर्च रिपोर्टही संशयाच्या घेºयात असून, प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यास आणखी काही कर्ज प्रकरणांमध्ये असाच घोळ समोर येण्याची शक्यता आहे.शास्त्री नगरातील अमानखा प्लॉटमधील प्लॉटधारकांच्या मुलांना खेळण्यासाठी तसेच वयोवृद्धांसाठी व्यायाम व इतर बाबींसाठी आरक्षित असलेल्या ९ हजार २४५ स्क्वेअर फूट भूखंडाचे महसूल विभाग आणि भूमी अभिलेख विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाºयांच्या संगनमताने एका कृषी सेवा केंद्राच्या संचालकाने बनावट दस्तऐवज तयार केले. या दस्तऐवजांच्या आधारे सर्व्हे क्रमांक १३/२ च्या शासकीय भूखंडाचा नमुना ड तयार करण्यात आला. त्यानंतर एका मोठ्या सहकारी बँकेकडून कर्ज घेण्यासाठी आवश्यक असलेले बनावट दस्तऐवज तयार केल्यानंतर शासकीय भूखंड गहाण देऊन त्यावर तब्बल दोन कोटी रुपयांचे कर्ज काढण्यात आले. २००४ मध्येच या भूखंडावर आरक्षण असताना तसेच बहुतांश दस्तावेजांमध्ये आरक्षण स्पष्ट दिसत असतानाही बँकेच्या व्यवस्थापकाने व वरिष्ठ अधिकाºयांनी काही बाबी अंधारात ठेवत दोन कोटींचे कर्ज वाटप केले. या कर्ज प्रकरणातील सर्च रिपोर्टही ‘मॅनेज’ असल्याचे सूत्रांचे म्हणणे असून, सदर बँकेतील आणखी काही कर्ज प्रकरणांची झाडाझडती घेतल्यास मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यता आहे. सदर कर्ज प्रकरणातील भूखंडाच्या लिलाव प्रक्रियेवर जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी रोक लावली आहे. मनपाकडेही आरक्षणाची नोंदमहापालिकेच्या नगर रचना आणि टाउन प्लानिंग विभागाकडे सदर भूखंडाच्या शासकीय आरक्षणाची नोंद असल्याची माहिती आहे. त्यामुळे बँकेला या नोंदीची माहिती होणे अपेक्षित होते; मात्र एवढे मोठे कर्ज देताना बँकेनेही कानाडोळा केल्याचे दिसून येत असून, या दिशेने चौकशी केल्यास कर्ज प्रकरणातील घोळही बाहेर येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी