शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातहून तीन ट्रकमध्ये आलेल्या ११८ लोकांना बाळापुरातच रोखले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 16:59 IST

ट्रकचालकांची चौकशी केली असता, या मजुरांना गुजरात राज्यातून आणल्याचे त्याने सांगितले.

ठळक मुद्दे बाळापूर ग्रामीण रुग्णालयात त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.या मजुरांची बाळापुरातील विविध ठिकाणी निवाºयाची सोय करण्यात आली.

बाळापूर: गुजरातहून तीन ट्रकमध्ये बसून अकोल्यात येत असलेल्या ११८ मजुरांना पोलिसांनी बुधवारी शेगाव टी पॉर्इंटवरील नाकाबंदीदरम्यान ताब्यात घेतले. तीनही ट्रकच्या चालकांविरूद्ध पोलिसांनी विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला. या सर्व मजुरांची आरोग्य तपासणी करण्यात आहे. या सर्वांची प्रकृती सध्या उत्तम आहे. या मजुरांची बाळापुरातील विविध ठिकाणी निवाºयाची सोय करण्यात आली.शेगाव टी पॉर्इंटवर नाकाबंदीदरम्यान पोलिसांना बुधवारी तीन ट्रक येताना दिसले. पोलिसांनी ट्रक थांबवून तपासणी केली असता, या ट्रकमध्ये ११८ मजूर असल्याचे दिसून आले. ट्रकचालकांची चौकशी केली असता, या मजुरांना गुजरात राज्यातून आणल्याचे त्याने सांगितले. ट्रकमधील सर्व लोकांची यापूर्वी देखिल वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. बुधवारी पुन्हा बाळापूर ग्रामीण रुग्णालयात त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या सर्व लोकांना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या आदेशानुसार तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी यांनी ३५ बाळापूर नगर परिषद सभागृहात, शेळद कन्या शाळा येथे ४२ लोकांची आणि राष्ट्रीय महामार्गावरील आयटीआय कॉलेज येथे ४१ लोकांची राहण्याची व खाण्याची सोय करण्यात आली आहे. या मजुरांसोबत लहान मुलांचा देखील समावेश आहे. याठिकाणी या लोकांवर वॉच ठेवण्यासाठी होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. गुजरात राज्यातून मजुरांना घेऊन येणारे ट्रकचालक राकेश संतोष ठाकरे, प्रदीप भास्कर जिपकंडे (रा.नागपूर)यांच्याविरूद्ध बाळापूर पोलिसांनी भादंवि कलम १८८, २६९, २७0 व राष्ट्रीय आपत्ती अधिनियम २00५ कलम ५१ महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ व मोटार वाहन कायदा कलम १९२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ट्रकचालकांचे तीनही ट्रक जप्त करण्यात आले आहेत. (शहर प्रतिनिधी)येथील राहणारे आहेत मजूर!मूर्तिजापूर येथे राहणारे ३४, कारंजा येथील ३५ , बाभूळगाव(पातूर) येथील ३0 आणि नेर येथील १४ मजुरांचा समावेश आहे. हे सर्व मजूर गुजरात राज्यात कामासाठी गेले होते.

जिल्हा सिमेवर वाहनांची तपासणी करताना, बाळापूर पोलिसांनी जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या तीन ट्रकला रोखले. या ट्रकमध्ये ११८ मजूर होते. या सर्वांची रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. लॉकडाऊनमुळे हाताला काम नसल्यामुळे हे मजूर गुजरातहून परतत होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार त्यांच्या निवासाची व भोजनाची व्यवस्था केली आहे. पुढे त्यांना त्यांच्या गावी सोडण्यात येईल.-पुरुषोत्तम भुसारी, तहसीलदार, बाळापूर

 

टॅग्स :AkolaअकोलाBalapurबाळापूरLabourकामगारGujaratगुजरात