शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

सर्वच विभागांच्या देयकांची यादी तयार करा!

By admin | Updated: April 18, 2017 01:49 IST

जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने निधी देण्याची तयारी

अकोला : जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचा निधी खर्च न होण्याच्या वादावर अखेर जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या मध्यस्थीने मार्ग निघाल्याची चर्चा आहे. त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण विधळे यांनी ३१ मार्च अखेर विविध विभागांकडे तयार असलेल्या देयकांची यादी तयार करण्याचे निर्देश सर्व विभागप्रमुखांना सोमवारी दिले. जिल्हा परिषदेला शासनाकडून प्राप्त निधीतून २०१६-१७ मध्ये ६५३ कामांसाठी शासनाने नऊ कोटी निधी दिला. मंजुरी मिळालेल्या कामांपैकी १५३ कामे मार्च अखेरपर्यंत पूर्ण झाली आहेत. त्या कामांची देयकेही ३१ मार्चपर्यंत बांधकाम विभागात सादर करण्यात आली. मात्र, ती अदा न झाल्याने निधी अखर्चित राहण्याची शक्यता निर्माण झाली. त्याबाबत पदाधिकाऱ्यांनी शासनासह विभागीय आयुक्तांकडे तक्रारी केल्या. त्यावर जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या उपस्थितीत बैठक घेत त्यावर तोडगा काढण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार सोमवारी झालेल्या बैठकीत तोडगा निघाल्याची माहिती आहे. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण विधळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी गीता नागर, कार्यकारी अभियंता एस.जी. गावंडे, जिल्हा परिषद कॉन्ट्रॅक्टर अ‍ॅण्ड इंजिनिअर असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष मनिराम टाले, सचिव गोपाल गावंडे उपस्थित होते. जिल्हा परिषदेतील विविध योजनांचा निधीजिल्हा वार्षिक योजनेतून रस्ते विकास- १ कोटी ६० लाख, आदिवासी उपयोजना- १४ लाख, प्राथमिक आरोग्य केंद्र बांधकाम- १ कोटी ६३ लाख, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र बांधकाम- ७७ लाख ६४ हजार, प्राथमिक आरोग्य संस्था बांधकामे- ६ लाख, ब वर्ग तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रम- १० लाख, माध्यमिक शाळा विशेष दुरुस्ती- २९ लाख, प्राथमिक शाळा इमारत बांधकाम- १५ लाख, प्राथमिक शाळा विशेष दुरुस्ती-१९ लाख, रस्ते दुरुस्ती गट अ- २० लाख, गट ब- २ कोटी २० लाख, गट क-३८ लाख, गट ड- ७ लाख, आमदारांचा स्थानिक विकास निधी- ७० लाख, डोंगरी विकास कार्यक्रम- १० लाख रुपयांचा समावेश आहे. तर उपकरातील अखर्चित निधीमधून जिल्हा परिषद इमारत देखभाल दुरुस्ती- १ कोटी २ लाख, ग्रामीण भागातील रस्ते दुरुस्ती व देखभाल- ४ कोटी ८४ लाख, ग्रामीण इमारती बांधकामे- २३ लाख, इमारत बांधकामे विस्तार- ८ लाख ९२ हजारांसह इतर मिळून ६ कोटी ३७ लाख रुपये परत जाण्याची शक्यता निर्माण झाली होती.