शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

द्रवरूप सूक्ष्म अन्नद्रव्य खते ठरणार पिकांसाठी प्रभावी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:21 IST

पिकाच्या जोमदार वाढीसाठी पीक पोषक अन्नद्रव्यांचा पुरवठा योग्य प्रमाणात होणे महत्त्वाचे आहे. सध्याची पीक जोपासना लक्षात घेतली तर आवश्यक ...

पिकाच्या जोमदार वाढीसाठी पीक पोषक अन्नद्रव्यांचा पुरवठा योग्य प्रमाणात होणे महत्त्वाचे आहे. सध्याची पीक जोपासना लक्षात घेतली तर आवश्यक १६ अन्नद्रव्यांपैकी नत्र, स्फुरद आणि पालाश या मुख्य अन्नद्रव्यांच्या वापरासंबंधी जितकी काळजी घेतली जाते, तितकी काळजी कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, गंधक ही दुय्यम अन्नद्रव्ये आणि लोह, जस्त, मँगेनीज, तांबे, बोरॉन, मॉलिब्डेनम या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या वापराबाबत घेतली जात नाही. मात्र, मागील काही काळात या अन्नद्रव्यांचा वापर वाढला आहे. यामध्ये खासगी कंपन्यांची उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत. परंतु, ती महागडी असल्याने शेतकऱ्यांना परवडणारी नाहीत. हा विषय हेरून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मृद, विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागाने या सूक्ष्म अन्नद्रव्याची निर्मिती सुरू केली. १५ ऑगस्ट रोजी या केंद्राचे उद्घाटन पार पडले. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना उच्चप्रतीचे सूक्ष्म अन्नद्रव्य मिळण्यास मदत होणार आहे. ही खते विदर्भातील ८ केव्हीकेमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे कृषी विद्यापीठाकडून सांगण्यात आले.

मुख्य अन्नद्रव्याची मुबलकता वाढविण्यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्याची गरज आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील जमिनीचे पृथक्करण करण्यात येत आहे. विद्यापीठाद्वारे हा प्रकल्प हाती घेण्यात आला असून, या प्रकल्पांना शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

- डॉ. संजय भोयर, विभाग प्रमुख, मृद विज्ञान व कृषी रसायन शास्त्र विभाग, डॉ. पंदेकृवि

सूक्ष्म अन्नद्रव्याची वाढत असलेली कमतरता लक्षात घेता, शेतकऱ्यांनी जमिनीतून व फवाऱ्याच्या माध्यमातून सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर केल्यास उत्पादनात वाढ होईल. शेतकऱ्यांना विद्यापीठाचा प्रकल्प फायदेशीर ठरणार आहे.

- डॉ. संदीप हाडोळे, प्रभारी अधिकारी, सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्य प्रकल्प

पिकांचे तीन ग्रेड तयार

या केंद्रातून निर्माण होणाऱ्या निविष्ठांमध्ये पीडीकेव्ही मायक्रो ग्रेड २ फळबाग व भाजीपाला पिकांकरिता, पीडीकेव्ही मायक्रो ग्रेड १० कडधान्य पिकांकरिता, पीडीकेव्ही मायक्रो ग्रेड ११ कपाशी पिकाकरिता तयार करण्यात आले आहे. राज्यातील शेतकऱ्यांना ना नफा, ना तोटा तत्त्वावर ही खते विद्यापीठाने उपलब्ध करून दिली आहेत.

राज्यातील एकमेव सेंटर

या प्रकल्पाकरिता भारतीय मृदा विज्ञान संस्था भोपाळ यांच्याकडून ७५ टक्के, तर राज्य सरकारकडून २५ टक्के अनुदान प्राप्त झाले आहे. तीन प्रकारच्या ग्रेडमध्ये द्रवरूप अन्नद्रव्य खते तयार करणारे हे राज्यातील एकमेव सेंटर असल्याचे कृषी विद्यापीठाकडून सांगण्यात आले.