शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

मध्यप्रदेशच्या धर्तीवर राज्यातही कन्यादान योजना लागू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 15:40 IST

अकोट : मध्यप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यामध्येही अनुसुचित जाती (एससी) मुलींसाठी मातोश्री रमाबाई आंबेडकर कन्यादान योजना सुरू करण्याची मागणी आकोट येथील रेनबो सामाजीक संस्थेने एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

ठळक मुद्दे राज्यात सुध्दा अनुसुचित जाती साठी (एससी) मातोश्री रमाबाई आंबेडकर कन्यादान योजना सुरू करावी. या योजनेअंतर्गत एक लाख रुपयांची आर्थिक मदत मुलीच्या बँक खात्यात जमा करावी, अशी मागणी.

अकोट : मध्यप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यामध्येही अनुसुचित जाती (एससी) मुलींसाठी मातोश्री रमाबाई आंबेडकर कन्यादान योजना सुरू करण्याची मागणी आकोट येथील रेनबो सामाजीक संस्थेने एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.महाराष्ट्र राज्य हे संपुर्ण देशात सर्वच बाबतीत आघाडीवर असलेले राज्य म्हणून ओळखले जाते. फुले, शाहु, आंबेडकरांचा वारसा या राज्याने जोपासला, जातीय सलोखा कायम राखण्यात महाराष्ट्र राज्य अग्रणी आहे. भारतीय संस्कृती नुसार मुलींचा विवाह संस्कार हा जीवनातील अतिशय महत्वाचा टप्पा असून कुठलाही माय किंवा बाप असणारा व्यक्ती आपल्या मुलीचा विवाह आपण चांगल्या पध्दतीने पार पाडू हे स्वप्न उराशी बाळगुन असतो. परंतू आर्थिक विवंचनेत असलेल्या माय किंवा बापाला मुलीचे लग्न जणू काही डोईवरचे ओझे वाटू लागते. अडचणीच्या वेळी माय किंवा बाप प्रसंगी कजार्ची उभारणी करून मुलीचे लग्न करतात. आणि उभारलेले कर्ज हे खाजगी सावकारांचे अतिशय जास्त व्याज आकारणीचे आणि प्रसंगी आयुष्यभर या कजार्ची फेड करणे शक्य नसल्याने हे कर्ज असते. यातूनच आत्महत्येचा विचार संकटात असलेल्या व्यक्तिला येतो. एकिकडे शेतीपासून मिळणारे उत्पन्न हे अतिशय तोकडे असून पिकांवर झालेला खर्च हा सुध्दा कधी कधी निघणे कठिण असते. अशा प्रकारे नैराश्याने ग्रासलेल्या व्यक्तिला सामाजिक दायित्व म्हणून महाराष्ट्र राज्य सरकारने मध्यप्रदेश राज्यात सुरू असलेल्या कन्यादान योजनेच्या धर्तीवर आपल्या राज्यात सुध्दा अनुसुचित जाती साठी (एससी) मातोश्री रमाबाई आंबेडकर कन्यादान योजना सुरू करावी. या योजनेअंतर्गत एक लाख रुपयांची आर्थिक मदत मुलीच्या बँक खात्यात जमा करावी, अशी मागणी रेनबो सामाजीक संस्थेचे अध्यक्ष संजय तेलगोटे यांच्यासह डॉ. मिलींद थोरात, डॉ. प्रा. रवि जुमळे, डॉ. प्रा. विलास तायडे, अ‍ॅड. राजेश वानखडे, डॉ. रवी राउत व संजय इंगळे यांनी केली आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाakotअकोटgovernment schemeसरकारी योजना