शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

इच्छुकांच्या गर्दीत ‘क्षमते’ला पसंती !

By admin | Updated: January 26, 2017 10:11 IST

उमेदवार निश्‍चितीसाठी राजकीय पक्षांची लगबग

अकोला : महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय उमेदवार निश्‍चित करण्याकरिता सर्वच राजकीय पक्षांची लगबग सुरू झाली आहे. त्यामध्ये उमेदवारी मिळविण्यासाठी प्रमुख राजकीय पक्षांकडे इच्छुक उमेदवारांची गर्दी असली, तरी उमेदवार निश्‍चित करताना निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांना उमेदवारी देण्याबाबत राजकीय पक्षांकडून पसंती देण्यात येत आहे.अकोला महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांच्या मोर्चेबांधणीला वेग आला आहे. त्यामध्ये भाजपा, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, उमेदवार निश्‍चित करण्याची लगबग सुरू करण्यात आली आहे. तर प्रभागनिहाय पक्षाच्या कार्यकर्त्यांंकडून प्राप्त झालेल्या इच्छुक उमेदवारांच्या नावांमधून उमेदवार निश्‍चित करण्याची प्रक्रिया भारिप-बमसं निवडणूक निरीक्षक उपसमितीकडून सुरू आहे. मनपा निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांची उमेदवारी मिळविण्यासाठी प्रभागातील एका जागेकरिता सात-आठ उमेदवार इच्छुक आहेत. त्यासाठी इच्छुक उमेदवारांनी संबंधित राजकीय पक्षाकडे अर्जही केले आहेत. मनपा निवडणुकीसाठी पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळविण्यासाठी प्रमुख राजकीय पक्षांकडे इच्छुक उमेदवारांची गर्दी असली, तरी प्रभागनिहाय उमेदवार निश्‍चित करताना निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांना सर्वच प्रमुख राजकीय पक्षांकडून प्राधान्य दिले जात आहे. त्यामध्ये प्रभागातील राजकीय आणि जातीय समीकरण विचारात घेऊन, इच्छुक उमेदवारांपैकी निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांना राजकीय पक्षांकडून पसंती दिली जात आहे.