शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

तेल्हारा व अकोट तालुक्यात वीज कोसळून चार जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 19:01 IST

तेल्हारा तालुक्यातील वरुड बु. येथे तीन जण ठार, तर अकोट तालुक्यातील बेलुरा येथे एक जण ठार झाल्याच्या दोन घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडल्या.

अकोला : शेतात काम करत असताना वीज कोसळून तेल्हारा तालुक्यातील वरुड बु. येथे तीन जण ठार, तर अकोट तालुक्यातील बेलुरा येथे एक जण ठार झाल्याच्या दोन घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडल्या. या घटनांमध्ये अन्य तीन जण जखमी झाले आहेत.तेल्हारा तालुक्यातील वरुड येथील गणेश वामनराव मोकळकार, नागोराव गुलाबराव अढाऊ, गजानन गुलाबराव अढाऊ, मीना गोपाल नारे, वैष्णवी नागोराव अढाऊ व लक्ष्मी नागोराव अढाऊ हे पाच जण वरुड-भोकर शिवारातील एका शेतात कापूस वेचण्यासाठी गेले होते. दुपारी अडीच वाजजाचे सुमारास अचानक वातावरण बदलले व विजांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली. यावेळी अचानक शेतात वीज कोसळली. यामध्ये गणेश मोकळकार, गजानन अढाऊ व लक्ष्मी अढाऊ हे या तीघांचा मृत्यू झाला. तर नागोराव अढाऊ व वैष्णवी अढाऊ हे गंभीर जखमी झाले.दुसºया घटनेत अकोट तालुक्यातील लाडेगाव शेतशिवारात काम करीत असलेल्या दादाराव पळसपगार व अनिल पंचाग यांच्या अंगावर वीज कोसळली. यामध्ये दादाराव पळसपगार यांचा जागीच मृत्यू झाला, तर अनिल पंचाग हा गंभीर जखमी झाला.नेत अकोट तालुक्यातील लाडेगाव शेतशिवारात काम करीत असलेल्या दादाराव पळसपगार व अनिल पंचाग यांच्या अंगावर वीज कोसळली. यामध्ये दादाराव पळसपगार यांचा जागीच मृत्यू झाला, तर अनिल पंचाग हा गंभीर जखमी झाला.

 

 

टॅग्स :AkolaअकोलाTelharaतेल्हाराakotअकोट