शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

अकोली जहाँगीरच्या विहिरीत पडलेल्या बिबट्याला  जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 01:44 IST

अकोट : अकोट तालुक्यातील अकोली जहाँगीर येथील  शेतशिवारात असलेल्या कोरड्या विहिरीत पडलेल्या  बिबट्याच्या पिल्लाला वन विभागाच्या अमरावती येथील  बचाव पथकाने ८ सप्टेंबर रोजी अथक परिश्रम घेऊन  बाहेर काढून जीवनदान दिले. 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : अकोट तालुक्यातील अकोली जहाँगीर येथील  शेतशिवारात असलेल्या कोरड्या विहिरीत पडलेल्या  बिबट्याच्या पिल्लाला वन विभागाच्या अमरावती येथील  बचाव पथकाने ८ सप्टेंबर रोजी अथक परिश्रम घेऊन  बाहेर काढून जीवनदान दिले. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या शहानूर वनपरिक्षेत्र  बीटमध्ये अकोली जहाँगीर येथील शंकर वाळके यांच्या  शेतातील कोरड्या विहिरीत ७ सप्टेंबर रोजी बिबट  पडल्याची माहिती मिळाली. प्रारंभी गावकर्‍यांनी व  अकोला, अकोट वन्य जीव विभागाच्या अधिकारी,  कर्मचार्‍यांनी त्याला बाहेर काढण्याकरिता विविध प्रयत्न  केले; परंतु बिबट्याचे छोटे पिल्लू असल्याने त्याला  सुखरूप बाहेर काढणे अवघड होते. खाट विहिरीमध्ये  सोडल्यावरही बिबटचे पिल्लू त्यावर बसत नसल्याने   शेवटी अमरावती येथील बचाव पथकाला बोलाविण्या त आले. या पथकाने विहिरीमध्ये जाळे टाकून व विविध  क्लृप्त्या वापरुन १२ तासांच्या अथक परिश्रमानंतर या  बिबट्याला ८ सप्टेंबर रोजी बाहेर काढून पिंजर्‍यात बंद  केले. या कामी अमरावती बचाव पथकाचे राउंड  ऑफीसर अजय बावणे, आर.एफ.ओ. वाजगे,  अकोला वन विभागाचे डीएफओ लोणकर, अमरावती  उपवनसंरक्षक हेमंतकुमार मीना, अकोला ए.सी.एफ.  सोनोने, अकोला आर.एफ.ओ.अशोक वायाळ, राउंड  ऑफीस प्रकाश गीते, वनरक्षक सरिता राऊत, धनंजय  सुरुशे,  मानद वन्य जीव संरक्षक बाळ काळणे, शेख  मुन्ना यांच्यासह गावकर्‍यांनी सहकार्य केले. बिबट्याचे  पिल्लू बाहेर काढल्यानंतर लोखंडी पिंजर्‍यात बंद करण्या त आले. त्यानंतर अकोट येथील वन्य जीव विभागात  हा पिंजरा आणण्यात आला. सदर बिबट्यावर वैद्यकीय  उपचार केल्यानंतर त्याला पुन्हा जंगलात सोडून देण्यात  येणार असल्याचे वन अधिकार्‍यांनी सांगितले.