शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

वाडेगाव येथील विद्यार्थ्यांचा डोंग्यातून जीवघेणा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 12:07 IST

शेकडो मुले-मुली शिक्षणाकरिता इंदिरा नगर (झोपडपट्टी) येथून निर्गुणा नदीच्या वाहत्या पात्रातून जीव धोक्यात टाकून ये-जा करीत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाडेगाव : येथील निर्गुणा नदीच्या पात्रावर पूल बांधण्यात न आल्याने दररोज २०० ते २५० विद्यार्थी डोंग्यातून प्रवास करीत असल्याचे चित्र आहे. डोंग्यातून जाताना मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन पूल बांधण्याची मागणी होत आहे.गावातील सोफी चौकमध्ये असलेल्या उर्दू जिल्हा परिषद शाळा, जिल्हा परिषद कन्या शाळा तसेच आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद शाळेत दररोज शेकडो मुले-मुली शिक्षणाकरिता इंदिरा नगर (झोपडपट्टी) येथून निर्गुणा नदीच्या वाहत्या पात्रातून जीव धोक्यात टाकून ये-जा करीत आहेत. उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होऊ नये, यासाठी नदीपात्रात कोल्हापुरी बंधारा बांधण्यात आला आहे. त्यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे या पाण्यातून पायी जाणे कठीण झाले आहे. या पाण्यातून जाण्यासाठी डोंगा तयार करण्यात आला आहे. नदीच्या दोन्ही काठांवर दोरी बांधण्यात आली असून, त्याच्या आधारे डोंग्यातून विद्यार्थ्यांची वाहतूक सुरू आहे. नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने केव्हाही मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारत येत नाही. त्यामुळे पालक आपल्या पाल्यांना नदीच्या दुसऱ्या काठावर पोहोचवून देत असल्याचे चित्र आहे. या नदीपात्रातून प्रवास टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना चार किलोमीटर फेºयाने प्रवास करावा लागतो. त्यामुळे खर्च परवडणारा नाही. नदीमधून प्रवास हा पाऊण ते एक किलोमीटर एवढा येत असल्यामुळे या पाण्यातून विद्यार्थी मार्ग काढत आहेत. याबाबत माजी ग्रामपंचायत सदस्य अय्याज साहिल यांनी पूल बांधण्याकरिता वेळोवेळी निवेदन दिले आहे; मात्र प्रशासनाकडे हे निवेदन धूळ खात असल्याचे चित्र आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन तातडीने पूल बांधण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)

टॅग्स :AkolaअकोलाStudentविद्यार्थी