शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी
2
रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु
3
रशिया-युक्रेन युद्धालाही मिळणार पूर्णविराम? 'या' दिवशी डोनाल्ड ट्रम्प घेणार पुतिन यांची भेट
4
तरुण असो वा वृद्ध.., पोस्टाच्या या जबरदस्त स्कीमनं घरबसल्या करू शकता कमाई; 'या' ट्रिकनं दरवर्षी मिळतील ₹१,११,०००
5
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
6
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
7
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
8
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
9
"राखी आहे, पण मिठी नाही...", रुचिता जाधवची रक्षाबंधननिमित्त भावासाठी खास पोस्ट
10
नरसिंह रावांसारखे धाडस नरेंद्र मोदी दाखवतील?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
12
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
13
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
14
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
15
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
16
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
17
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
18
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
19
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
20
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी

शहरीकरणाच्या विळख्यात अडकली जीवनदायिनी

By admin | Updated: December 12, 2014 01:14 IST

अकोल्यात मोर्णा तहानलेलीच.

डॉ. किरण वाघमारे / अकोलामोर्णा नदीचा उपयोग अकोला शहराच्या पाणीपुरवठय़ासाठी होत नसला तरी जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये आजही मोर्णा ही जीवनदायिनी आहे. या गावांमध्ये ती जशी माणसांची तृष्णा भागवते, तसाच गुराढोरांसाठीदेखील मोर्णेच्या पाण्याचा वापर केला जातो. सुदैवाने या गावांमध्ये मोर्णेची स्थिती आजही बरी आहे. अकोल्यात मात्र मोर्णेची अवस्था दयनीय झालेली आहे. मोर्णेचा उगम वाशिम जिल्ह्यातील मेडशीच्या वर मुंगळा परिसरात आहे. या ठिकाणी आजूबाजूला जंगल आहे. त्यामुळे मोर्णा जंगलातील वनस्पतींचे औषधी गुणधर्म घेऊन वाहत येते. त्यामुळे या पाण्याचे महत्त्व सर्वसाधारण नव्हे, अनन्यसाधारण आहे. मेडशी येथे मोर्णा नदीवर धरण आहे. या धरणामुळे आसपासच्या गावांतील शेतजमिनीला फायदा झाला आहे, सोबतच या गावांमधील गावकर्‍यांची तहानदेखील मोर्णा भागवीत आहे. मेडशीवरून पुढे पातूरच्या जंगलातून मार्गक्रमण करीत मोर्णा आष्टुल-पाष्टुल येथे येते. तिथेदेखील मोर्णा धरण बांधले गेले आहे. एक पर्यटनस्थळ म्हणूनदेखील मोर्णा प्रकल्प एक चांगली जागा आहे. पाष्टुल येथे सीतान्हाणी ही छोटी नदी मोर्णेला मिळते. पुढे मोर्णा आगीखेड, खामखेड, वरखेड, वाघजाळी, राजंदा, म्हैसपूर व चांदूर मार्गे अकोल्यात येते. या सर्वच गावांमध्ये मोर्णेच्या पाण्याचा उपयोग सिंचन आणि पिण्यासाठी केला जातो. चांदूर येथे विद्रुपा मोर्णेला येऊन मिळते. या दोन बहिणी एकत्रच पुढील प्रवास करतात. अकोल्यातून होणारा मोर्णेचा प्रवास मात्र मोठा खडतर आहे. घाण पाणी, कचरा आणि जलकुंभी यांनी मोर्णेच्या वाटेत अडथळे निर्माण केले आहेत. या अडथळ्यांना पार करीत पुढे निघालेली मोर्णा उगवा,आगर, पाळोदी, गोत्रा, खांबोरा, मालवाडा, हातरुण, दुधाळा मार्गे पुढे अंदुरा येथे जाते व वांगरगावनजीक पूर्णेला मिळते. या सर्वच लहान-मोठय़ा गावांसाठी मोर्णा केवळ एक नदी नाही, तर ती जीवनदायिनी आहे. अकोल्याला मोर्णेने एक ओळख दिली असली तरी अकोलेकर मोर्णेला विसरले आहेत. त्याचे परिणाम अकोलेकरांना पाणीटंचाईच्या स्वरुपात भोगावे लागत आहेत. मोर्णा केवळ अकोल्यासाठीच नाही तर अनेक गावांसाठी भाग्यविधाती होऊ शकते, हे लक्षात घेऊन मोर्णेच्या मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी अकोलेकरांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे