शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सहका-याची हत्या करणा-या आरोपीस जन्मठेप

By admin | Updated: April 1, 2017 03:02 IST

किरकोळ वादातून दगड घातला डोक्यात.

अकोला, दि. ३१- चिलिम ओढण्याच्या वादातून सहकार्‍याच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या करणारा आरोपी मनिष मदनलाल जोशी(४0) याला शुक्रवारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.झेड. ख्वाजा यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मोहता मिल चाळमधील तपे हनुमान मंदिराजवळ राहणारे गजानन रामकिसन कौशल(४२) आणि त्यांचा सहकारी मनिष मदनलाल जोशी हे मंदिरातच साफसफाईचे काम करायचे. दोघेही व्यसनाधिन होते. अनेकदा त्यांच्यात क्षुल्लक कारणावरून वाद व्हायचा. २२ ऑक्टोबर २0१५ ला दसर्‍याच्या दिवशी रात्री दोघांमध्ये चिलिम ओढण्याच्या कारणावरून वाद झाला. वाद विकोपाला गेल्याने, आरोपी मनिषने गजाननच्या डोक्यावर दगड घातला. यात गजानन गंभीर जखमी झाला. गजानन रक्ताच्या थारोळय़ात पडलेला पाहून मनिष जोशी घाबरला आणि त्याने परिसरातील नागरिकांना गजानन जखमी झाल्याची माहिती दिली. गजाननचा पुतण्या लखन सुरेश कौशल(२८) याने ऑटोरिक्षा बोलावून तातडीने गजानन कौशल याला रामदासपेठ पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर त्याला सर्वोपचार रुग्णालयात भरती केले. उपचारादरम्यान रात्री १ वाजताच्या सुमारास जखमी गजाननचा मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळावर पोहोचून तेथील रहिवाशांचे जबाब नोंदविले. त्यांच्या जबाबामध्ये रात्रीच्यावेळी गजाननजवळ जाताना मनिष जोशी याला पाहिल्याचे काहींनी पोलिसांना सांगितले. लखन कौशल याच्या तक्रारीनुसार रामदासपेठ पोलिसांनी आरोपी मनिष जोशी याच्याविरुद्ध भादंवि कलम ३0२ नुसार गुन्हा दाखल केला. सहायक पोलीस निरीक्षक तिरूपती राणे यांनी प्रकरणाचा तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. शुक्रवारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.झेड. ख्वाजा यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. सरकार पक्षाने बारा साक्षीदार तपासले. साक्ष व पुरावे ग्राहय़ मानून न्यायालयाने आरोपी मनिष जोशी यास जन्मठेप, पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावली. सरकारतर्फे सहायक सरकारी विधिज्ञ आनंद गोदे यांनी बाजू मांडली. श्‍वानाने ओळखला आरोपीगजाननची हत्या केल्यानंतर आरोपी मनिषने गजानन जखमी झाल्याचा बनाव करून नागरिकांना माहिती दिली होती; परंतु पोलिसांना गजाननची हत्या केल्याचा संशय होता. त्यासाठी त्यांनी श्‍वान पथकाला पाचारण केले. श्‍वानाला रक्ताने माखलेल्या दगडाचा वास देण्यात आला. त्यानंतर श्‍वानाने आरोपी मनिष जोशीवर झडप घेतली आणि त्याच्यावर भुंकण्यास सुरुवात केल्यावर मनिषच्या चेहर्‍यावरील हावभाव बदलले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यावर त्याची चौकशी केली. चौकशीत त्याने हत्या केल्याची कबुली दिली.