शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

पत्नीला जिवंत जाळणाऱ्या पतीस जन्मठेपेची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 17:47 IST

दहीहांडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील करतवाडी रेल्वे येथील रहिवासी पतीने पत्नीला जिवंत जाळल्यानंतर हत्येच्या आरोपाखाली आढळलेल्या ठोस पुराव्यांच्या आधारे आकोट जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी पतीस मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

अकोला : दहीहांडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील करतवाडी रेल्वे येथील रहिवासी पतीने पत्नीला जिवंत जाळल्यानंतर हत्येच्या आरोपाखाली आढळलेल्या ठोस पुराव्यांच्या आधारे आकोट जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी पतीस मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आकोश उर्फ अशोक धनराज कीरडे असे आरोपीचे नाव असून त्याला एक हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली.करतवाडी रेल्वे येथील रहिवासी आकोश उर्फ अशोक धनराज कीरडे (४०) याने त्याची पत्नी मंगला आकोश कीरडे हीच्या चारीत्र्यावर संशय घेउन तीला ३१ जानेवारी २०१७ रोजी रात्रीच्या सुमारास अंगावर रॉकेल टाकुन पेटविले होते. यामध्ये मंगला यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे नातेवाईक सुरेश शंकरराव एकीरे यांनी दहीहांडा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी आकोश उर्फ अशोक धनराज कीरडे याच्याविरुध्द भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर या प्रकरणाचा तपास पीएसआय सतीष दोनकलवार यांनी करून दोषारोपपत्र आकोट येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केले. या प्रकरणात सरकार पक्षाच्यावतीने १२ साक्षीदार तपासण्यात आले. त्यानंतर आकोट येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश मनीष गणोरकर यांनी आरोपीस भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२ अन्वये दोषी ठरवीत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यासोबतच एक हजार रुपये दंड ठोठावला असून दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त शिक्षेचे प्रावधान न्यायालयाने केले आहे. या प्रकरणी पैरवी अधिकारी म्हणूण पोलीस कर्मचारी अरुण तेलगोटे यांनी कामकाज पाहीले.

 

टॅग्स :AkolaअकोलाLife Imprisonmentजन्मठेपCourtन्यायालय