शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

‘पॉस’ टाळून खतांची विक्री केल्यास परवाना रद्द होणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 10:36 IST

पॉस मशीनऐवजी आॅफलाइन विक्री केल्यास त्याचा परवाना रद्दचा प्रस्ताव सादर करा, असे निर्देश जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ दिले.

अकोला : रासायनिक खतांची विक्री करताना ती पॉस मशीनद्वारेच करावी, कोणत्याही विक्रेत्याने पॉस मशीनऐवजी आॅफलाइन विक्री केल्यास त्याचा परवाना रद्दचा प्रस्ताव सादर करा, असे निर्देश जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ यांनी जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीच्या बैठकीत सोमवारी कृषी अधिकाऱ्यांना दिले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात पार पडलेल्या या बैठकीत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह बियाणे, खते, कीटकनाशक उत्पादक, वितरक, कृषी सेवा केंद्र संचालक, रेल्वे, उपप्रादेशिक अधिकारी कार्यालय, माथाडी कामगारांसह विविध विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी डॉ. मुरली इंगळे यांनी प्रास्ताविक केले. त्यामध्ये त्यांनी बियाणे व खत पुरवठ्याच्या नियोजनाबाबत माहिती दिली. सोबतच चालू वर्षात कापूस, सोयाबीनचे क्षेत्र कमी करून अन्नधान्याचे क्षेत्र वाढविण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यात खरिपासाठी लागणाºया खतांचा पुरवठा संबंधित कंपन्यांनी करावा, यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे. तसेच कंपन्यांनी शेतकºयांची गर्दी कमी करण्यासाठी डिलरची संख्या वाढविण्याचे सांगितले जाणार आहे.खतांची विक्री करताना लिंकिंग करू नये, तसेच पॉस मशीनऐवजी आॅफलाइन खतांची विक्री केल्यास संबंधितांचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव कृषी विकास अधिकाºयांनी सादर करावा, त्यानुसार कारवाई केली जाईल, असेही वाघ यांनी यावेळी सांगितले. यावर्षी विस्तार कार्यासाठी निधी मिळणार नसल्याने कंपन्यांनी सीएसआर निधीतून प्रात्यक्षिके घ्यावी, शेतकºयांना माहिती द्यावी, प्रशिक्षण द्यावे, असेही बैठकीत सांगण्यात आले. कापूस बियाण्यांचे वाटप १५ मेपासून करण्याचेही निर्देश देण्यात आले. कृषी साहित्य गावापर्यंत पोहचवून देण्याचेही यावेळी ठरवण्यात आले. सोयाबीन बियाण्याची टंचाई भासू नये, यासाठी ग्रामबीजोत्पादनांतर्गत बियाणे उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली. बैठकीला मोहीम अधिकारी मिलिंद जंजाळ, गुणनियंत्रण अधिकारी नितीन लोखंडे, सर्व तालुकास्तरीय कृषी अधिकारी, जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचे संजय गवई, संजय गवळी, पंकज जगताप यांच्यासह संबंधित प्रतिनिधी उपस्थित होते.

मध्यप्रदेशातील बियाण्यांवर वॉचमध्यप्रदेशातून उत्पादित होणाºया कंपन्यांच्या बियाण्यांवर लक्ष ठेवण्यासाठी कृषी विभागाचे कर्मचारी, कृषी मित्र यांची उपस्थिती डिलरकडे ठेवली जाणार आहे. त्यातून या बियाण्यांच्या विक्रीवर लक्ष ठेवले जाणार आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAgriculture Sectorशेती क्षेत्र