शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

‘टॅक्स’च्या मुद्यावर १२ आठवड्यांत निर्णय घेऊ; राज्य शासनाचे नागपूर हायकोर्टात उत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 13:07 IST

अकोला: महापालिका प्रशासनाच्या करवाढीला भारिप-बमसंच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिकेद्वारे आव्हान दिले असता, या विषयावर शुक्रवारी न्यायमूर्ती आर. के. देशपांडे, व्ही.जी. जोशी यांच्या द्विसदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी पार पडली.

अकोला: महापालिका प्रशासनाच्या करवाढीला भारिप-बमसंच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिकेद्वारे आव्हान दिले असता, या विषयावर शुक्रवारी न्यायमूर्ती आर. के. देशपांडे, व्ही.जी. जोशी यांच्या द्विसदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. त्यावेळी राज्य शासनाच्यावतीने अधिवक्ता आनंद देशपांडे यांनी ‘टॅक्स’च्या मुद्यावर १२ आठवड्यांत निर्णय घेऊ, अशी भूमिका स्पष्ट केली.मनपा प्रशासनाने केलेली सुधारित करवाढ नियमानुसार नसल्याचा आक्षेप घेत भारिप-बमसंचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ८ फेब्रुवारी रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. प्राप्त याचिकेनुसार हायकोर्टाने राज्य शासनासह मनपा प्रशासनाला उत्तर सादर करण्यासाठी एक आठवड्याचा अवधी दिला होता. त्यावेळी अ‍ॅड. आंबेडकर यांनी हायकोर्टात स्वत: बाजू मांडली होती. मनपाला नियमानुसार करवाढ करताना दीड टक्क्यांपेक्षा अधिक दर लागू करता येत नाही. प्रशासनाने चॅरिटेबल ट्रस्ट, धार्मिक स्थळांवरही मालमत्ता कर लागू केला. सभागृहात सर्व नगरसेवकांच्या संमतीने ठराव मंजूर करणे आवश्यक होते. तसे न करता महापौर विजय अग्रवाल यांनी ठरावाला मंजुरी दिली. प्रशासनाने नियुक्त केलेल्या खासगी एजन्सीने नागरिकांच्या पूर्वसंमतीशिवाय मालमत्तांचे मोजमाप करण्यासोबतच मनपाने ‘रेटेबल व्हॅल्यू, कॅपिटल व्हॅल्यू’ निश्चित न करताच ठराव पारित केल्याचे मुद्दे न्यायालयात मांडले होते. त्यावर द्विसदस्यीय खंडपीठाने राज्य शासन व मनपा प्रशासनाला सात दिवसांत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला होता. यासंदर्भात शुक्रवारी न्यायमूर्ती आर. के. देशपांडे, व्ही. जी. जोशी यांच्यासमोर सुनावणी पार पडली असता, शासनाच्यावतीने अधिवक्ता आनंद देशपांडे यांनी लेखी उत्तर सादर केले. करवाढीच्या मुद्यावर बारा आठवड्यांत योग्य तो निर्णय घेणार असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यावेळी विधिज्ञ समीर सोहनी यांनी मनपाच्यावतीने भक्कमपणे बाजू मांडली.

 

टॅग्स :AkolaअकोलाHigh Courtउच्च न्यायालय