शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

शेतकर्‍यांना न्याय मिळवून देऊ - धोत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 01:33 IST

अन्यायग्रस्त शेतकर्‍यांनी रविवारी खासदार संजय धोत्रे यांची भेट घेतली. खा. धोत्रे यांनी याविषयी भूसंपादन अधिकार्‍यांशी चर्चा केली, तसेच शेतकर्‍यांवरील अन्याय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबरोबर बैठक लावून दूर करण्याचे आश्‍वासन दिले.

ठळक मुद्देभूसंपादनकेंद्रीय मंत्र्यांबरोबर लवकरच घेणार बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कपारस : राष्ट्रीय महामार्ग क्र. सहाच्या चौपदरीकरणाच्या कामात जमीन संपादित करण्यात आली. यामध्ये बाळापूर तालुक्यातील शेतकर्‍यांची जमीन शासनाने संपादित केली आहे. त्याचा मोबादला देताना मात्र बाळापूर तालुक्यातील शेतकर्‍यांवर अन्याय करण्यात आला आहे. याविषयी अन्यायग्रस्त शेतकर्‍यांनी रविवारी खासदार संजय धोत्रे यांची भेट घेतली. खा. धोत्रे यांनी याविषयी भूसंपादन अधिकार्‍यांशी चर्चा केली, तसेच शेतकर्‍यांवरील अन्याय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबरोबर बैठक लावून दूर करण्याचे आश्‍वासन दिले. राष्ट्रीय महामार्ग क्र. सहाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. या कामासाठी शेतकर्‍यांची जमीन संपादित करण्यात आली आहे. संपादित जमिनीचा मोबदला देताना मात्र बाळापूर तालुक्यातील शेतकर्‍यांना इतरांच्या तुलनेत कमी देण्यात आला. त्यामुळे या शेतकर्‍यांनी आतापर्यंत अनेक निवेदने दिली आहेत. रविवारी या अन्यायग्रस्त शेतकर्‍यांनी खासदार संजय धोत्रे यांची भेट घेतली. यावेळी खासदार धोत्रे यांनी या प्रकरणाची माहिती घेतली व भूसंपादन अधिकारी संजय खडसे यांच्याशी चर्चा केली. तसेच या अन्यायासंदर्भात केंद्रीय महामार्ग रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन लवकरच बैठक लावून शेतकर्‍यांना न्याय देऊ, असे आश्‍वासन दिले. आमदार रणधीर सावरकर यांनी हा प्रश्न येत्या हिवाळी अधिवेशनात मांडणार असल्याचे सांगितले. यावेळी भाजप जिल्हा अध्यक्ष तेजराव थोरात यांनी शेतकर्‍यांना न्याय मिळेपर्यंत त्यांच्यासोबत राहण्याची विनंती खासदार धोत्रे यांना केली. यावेळी खा. संजय धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, भाजपा जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, भूसंपादन अधिकारी संजय खडसे, मुरलीधर राऊत, विलास पोटे, मो. अब्रार, संजय शर्मा, कंडारकर, वारकरी, हिवरकर यांच्यासह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :Sanjay Dhotreसंजय धोत्रे