लोकमत न्यूज नेटवर्कअकोट - नैसर्गिक शेती करीत असलेल्या शेती मध्ये प्रत्यक्ष जाऊन प्रात्यक्षिक अनुभवता यावे या करिता अकोट येथील श्रध्दासागर येथे आयोजित केलेल्या झिरो बजेट नैसर्गिक शेती संबंधित अभ्यासाकरिता शिवार फेरीत देशविदेशातील ४00 शे तकर्यांनी हजेरी लावली आहे. नैसर्गिक शेतीचे प्रणेते पद्मश्री सुभाष पाळेकर यांच्या उपस्थितीत ८ नोव्हेंबर पर्यंत हे शेतकरी नैसर्गिक शेतीचे धडे घेणार आहेत. श्रध्दासागर येथून सुरु झालेल्या या फेरीत १२ राज्यातील शेतकरी तसेच बांग्लादेश व इतर देशातील शेतकर्यांनी ६ नोव्हेंबर रोजी अंजनगाव, परतवाडा, अमरावती या भागातील नैसर्गिक शेतीच्या मॉडेलला भेटी देऊन विस्तृत माहिती घेतली. तसेच मंगळवारी अकोट तालुक्यातील नैसर्गिक शेती शिवारात हे शेतकरी दाखल होणार आहेत. विषारी अन्नामुळे मानवी जीवन धोक्यात आले आहे. अशात रासायनिक शेतीच्या तुलनेत नैसर्गिक शेतीचं उत्पन्न कमी असल्याचा दुष्प्रचार बि.टी.उत्पादक करीत असल्याचे दिसत आहेत. शेतकर्यांना वस्तुस्थिती काय आहे याची जाणिव व्हावी व याकरिता प्रत्यक्ष शेतावर जाऊन नैसर्गिक शेतीच्या पिकाची पाहणी करणे करीता शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. या शिवार फेरीमध्ये गुजरात, तामिळनाडू, हरियाना, कर्नाटक, दिल्ली, पश्चिमबंगाल, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, तेलंगाणा, आंध्रप्रदेश तसेच बांग्लादेशातील शेतकरी सहभागी झाले असल्याची माहिती शरद नहाटे यांनी दिली.
अकोट येथील शिवार फेरीत शेतकर्यांना ‘झिरो बजेट नैसर्गिक शेती’चे धडे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 20:15 IST
अकोट - नैसर्गिक शेती करीत असलेल्या शेती मध्ये प्रत्यक्ष जाऊन प्रात्यक्षिक अनुभवता यावे या करिता अकोट येथील श्रध्दासागर येथे आयोजित केलेल्या झिरो बजेट नैसर्गिक शेती संबंधित अभ्यासाकरिता शिवार फेरीत देशविदेशातील ४00 शे तकर्यांनी हजेरी लावली आहे.
अकोट येथील शिवार फेरीत शेतकर्यांना ‘झिरो बजेट नैसर्गिक शेती’चे धडे!
ठळक मुद्देदेश विदेशातील ४00 शेतकरी दाखलनैसर्गिक शेतीचे प्रणेते पद्मश्री सुभाष पाळेकर यांची उपस्थिती