शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात संशोधकांना अपारंपरिक ऊर्जा विकासाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 14:16 IST

अकोला: नैसर्गिक संसाधनांचा वापर करू न विकास साधण्यावर शासन भर देत असून, ग्रामीण भागात अपारंपरिक ऊर्जास्रोताचा वापर वाढविण्यासाठी लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

ठळक मुद्देअपारंपरिक ऊर्जेचे प्रशिक्षण देण्यासाठी राज्यातून अकोल्याच्या कृषी विद्यापीठाची निवड केली आहे.कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात आदी राज्यातील कृषी विद्यापीठांच्या शास्त्रज्ञांसह राज्यातील कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी सहभाग घेतला आहे.

अकोला: नैसर्गिक संसाधनांचा वापर करू न विकास साधण्यावर शासन भर देत असून, ग्रामीण भागात अपारंपरिक ऊर्जास्रोताचा वापर वाढविण्यासाठी लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या अनुषंगाने या तंत्रज्ञानाची सर्वंकष शास्त्रीय माहिती देण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात या तंत्रज्ञानाचा विकास व वापर करण्यासंबंधीचे धडे देशातील संशोधकांना देण्यात येत आहेत.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने अपारंपरिक ऊर्जास्रोत या विषयावर संशोधन करू न विविध तंत्रज्ञान विकसित केले आहे. ग्रामीण भागात या तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार होण्यासाठी भारतीय कृषी व कल्याण मंत्रालयांतर्गत कार्य करणाऱ्या भारतीय संशोधन परिषदेने लक्ष केंद्रित केले असून, अपारंपरिक ऊर्जेचे प्रशिक्षण देण्यासाठी राज्यातून अकोल्याच्या कृषी विद्यापीठाची निवड केली आहे. १ आॅक्टोबरपासून या कार्यशाळेला सुरुवात झाली असून, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात आदी राज्यातील कृषी विद्यापीठांच्या शास्त्रज्ञांसह राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील या विषयाशी संबंधित शास्त्रज्ञांनी सहभाग घेतला आहे.या ठिकाणी कृषीवर आधारित बायोगॅस उत्पादन, सोलर इलेक्ट्रिकल्स वाहने, शेतातील ऊर्जा कार्यक्षम यंत्र, सौर ऊर्जेपासून विद्युत निर्मिती, सिंचन व्यवस्था, बायोगॅस, शेतातील काडीकचºयापासून विटा तयार करू न ऊर्जानिर्मिती करणे, गोड्या ज्वारीच्या धांड्यापासून जैवइंधन या विषयावर येथे मंथन होणार आहे. या कृषी विद्यापीठाने राज्यातील ग्रामीण भागात बायोगॅस प्रकल्प लावण्याचे काम केले असून, या प्रकल्पांना भेटी देण्यात येणार आहेत. चिखलदरा येथील पवन ऊर्जा, शेगाव येथील पवन ऊर्जा पार्क कसा चालतो, याचा अभ्यास करण्यासाठी शास्त्रज्ञांच्या भेटीचेही नियोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणात शास्त्रीय माहिती देण्यासाठी देशातील तज्ज्ञांनी सहभाग घेतला आहे.

 भविष्यात अपारंपरिक ऊर्जेचा वापर वाढविण्यासाठी तंत्रज्ञान विकसित केले आहे. या तंत्रज्ञानाचा ग्रामीण भागात प्रचार व प्रसार होण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.डॉ. सुरेंद्र काळबांडे, प्रमुख, अपारंपरिक ऊर्जा व इलेक्ट्रिक तथा कार्यशाळा संचालक, डॉ. पंदेकृवि, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ