शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेची काेराेना पाॅझिटिव्ह रूग्णांकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:34 IST

शहरात पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा माेठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असून रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. संशयित किंवा ...

शहरात पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा माेठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असून रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. संशयित किंवा कोरोना बाधित रूग्णाचा जिल्हा सामान्य रूग्णालयाकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर सर्वप्रथम मनपाच्या वैद्यकीय आरोग्य यंत्रणेने सतर्क होऊन रूग्णाला उपचारासाठी दाखल करण्यापासून ते संबंधित रूग्णाच्या संपर्कातील व्यक्तींची माहितीची नोंद ठेवण्याची गरज आहे. जिल्हा सामान्य रूग्णालयाकडून कोरोना बाधित रूग्णांची माहिती प्राप्त झाल्यानंतर वैद्यकीय यंत्रणेने मलेरिया विभागाला पूर्व सूचना देऊन फवारणीसाठी पथके रवाना करणे,बाधित रुग्णाच्या कुटुंबातील सदस्यांची तपासणी करण्याची आवश्यकता असताना हा विभाग कुंभकर्णी झाेपेत असल्याची बाब समाेर आली आहे. शहरात काेराेना बाधितांची संख्या वाढत चालली असताना मनपाची वैद्यकीय आरोग्य यंत्रणा नेमके कोणते कर्तव्य बजावत आहे, यावर प्रशासनाने आत्मचिंतन करण्याची गरज निर्माण झाली आहे.

पालकमंत्र्यांसमोर प्रशासन तोंडघशी

सुरूवातीच्या कालावधीत काेराेना विषाणूबद्दल नागरिकांमध्ये भीती व धास्ती हाेती. एप्रिल ते जून महिन्यात रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पालकमंत्री ना.बच्चू कडू यांनी मनपा प्रशासनाला शहरात हाॅटस्पाॅट ठरलेल्या प्रभागातील रहिवाशांची आराेग्य तपासणी माेहीम राबविण्याचे निर्देश दिले हाेते. वैद्यकीय यंत्रणेने अतिशय थातूरमातूर पद्धतीने माेहीम राबवून गाशा गुंडाळला. या माेहिमेत किती जणांची तपासणी केली,याबद्दल तत्कालीन आयुक्त संजय कापडणीस यांना चुकीची माहिती सादर केली हाेती. ही माहिती पालकमंत्र्यांसमाेर सादर करताना प्रशासन ताेंडघशी पडले हाेते,हे विशेष.

पाॅझिटिव्ह रूग्णांच्या आकडेवारीचा संभ्रम

मनपा प्रशासनाने प्रभारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. फारूख शेख यांच्याकडे सनियंत्रण अधिकारी पदाची जबाबदारी सोपवली आहे. या विभागाकडे शहरातील पाॅझिटिव्ह रुग्णांची अचूक आकडेवारी उपलब्ध नसल्याची माहिती आहे. तसेच दरराेज किती पाॅझिटिव्ह रुग्णांची घरी जाऊन पाहणी केली, घराचे निर्जंतुकीकरण केले का,याबद्दल हा विभाग अनभिज्ञ असल्याची परिस्थिती आहे.