शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

चुकीचे रिडिंग घेणार्‍या दोघांना केले कामावरून कमी; कंत्राटदारही बदलला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 01:35 IST

बोरगाव वैराळे :  हातरुण निमकर्दा वीज उपकेंद्रावरून वीज पुरवठा होणार्‍या बोरगाव वैराळे गावात येथील ग्राहकांना वीज मीटरचे रिडिंग न घेता वीज देयक देण्याचा प्रकार मागील काही महिन्यांपासून सुरू असल्यामुळे येथील वीज ग्राहक त्रस्त झाले होते. याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित होताच बाळापूर येथील उपविभागीय अभियंता पी.डी. काळे यांनी बोरगाव वैराळे गावात मीटर रिडिंग घेण्याचे काम करणारे संजय भाकरे व महेश घोपे या दोघांना तडकाफडकी कंत्राटी कामावरून कमी केले.

ठळक मुद्देमीटर रिडिंग न घेता देयक देणे भोवले 

लोकमत न्यूज नेटवर्कबोरगाव वैराळे :  हातरुण निमकर्दा वीज उपकेंद्रावरून वीज पुरवठा होणार्‍या बोरगाव वैराळे गावात येथील ग्राहकांना वीज मीटरचे रिडिंग न घेता वीज देयक देण्याचा प्रकार मागील काही महिन्यांपासून सुरू असल्यामुळे येथील वीज ग्राहक त्रस्त झाले होते. याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित होताच बाळापूर येथील उपविभागीय अभियंता पी.डी. काळे यांनी बोरगाव वैराळे गावात मीटर रिडिंग घेण्याचे काम करणारे संजय भाकरे व महेश घोपे या दोघांना तडकाफडकी कंत्राटी कामावरून कमी केले. तसेच  बाळापूर तालुक्यातील वीज मीटरचे रिडिंगचे काम करण्याचे कंत्राट रद्द करून खामगाव येथील कंत्राटदाराला दिले. बोरगाव वैराळे येथील माणिकराव वैराळे यांचे २२ हजार, तर विनायक वानखडे यांचे २३00 रुपये बिल कमी करून, नव्याने दुसरे बिल दिले असल्याची माहिती उपविभागीय अभियंता पी.डी. काळे यांनी दिली  बोरगाव वैराळे येथील ५0 टक्के वीज ग्राहकांना रिडिंग न घेता वीज मीटर फॉल्टी दाखवून अंदाजाने अव्वाच्या सव्वा वीज देयके कंत्राटदाराची खासगी व्यक्ती देत असल्याचा प्रकार मागील काही दिवसांपासून सुरू होता. त्यामुळे बोरगाव वैराळे येथील माणिकराव वैराळे यांना ३0 हजार रुपये, तर विनायक वानखडे यांना ५२५0 रुपये वीज देयक देण्यात आले होते. याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित करताच उपविभागीय अभियंता यांनी या दोन्ही ग्राहकांना बाळापूर येथे बोलावून घेऊन माणिकराव वैराळे यांचे २२ हजार वीज बिल कमी करून केवळ आठ हजार बिल भरण्याबाबत सांगितले व विनायक वानखडे यांना २३00 रुपये कमी करून २९५0 रुपये बिल भरण्याबाबत सांगितले. 

बोरगाव वैराळे येथील वीज मीटर रिडिंग घेण्याची जबाबदारी असणार्‍या संजय भाकरे व महेश घोपे या कंत्राटी कामगारांना कामावरून कमी करण्यासोबत बाळापूर तालुक्याचे कंत्राटदेखील या कंत्राटदाराना कडून काढून घेण्यात आले आहेत. नवीन कंत्राटदारांना काम देण्यात आले असून, ९0 टक्के ग्राहकांना रिडिंगनुसार बिले देण्यावर आमचा भर राहील.-पी.डी. काळे, उपविभागीय अभियंता बाळापूर 

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणmahavitaranमहावितरण