शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

‘कृषी’ला कमी निधी; जिल्हा परिषदच्या सभेत वादंग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 10:24 IST

कृषी समितीच्या सभेत सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत, निधी वाढवून देण्याची मागणी केली.

अकोला : जिल्हा परिषदेच्या ‘बजेट’मध्ये कृषी विभागाच्या योजनांसाठी कमी निधी मिळाल्याच्या मुद्यावर शुक्रवारी जिल्हा परिषद कृषी समितीच्या सभेत सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत, निधी वाढवून देण्याची मागणी केली. या मुद्यावरील चर्चेत सभेत काही काळ वादंग झाल्याने कृषी समितीची सभा चांगलीच गाजली.जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत विविध योजना राबविण्यासाठी कृषी विभागाला ७ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी असताना, जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात (बजेट) कृषी विभागाला २ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला. कृषी विभागाच्या योजनांसाठी निधी कमी मिळाल्याच्या मुद्यावर जिल्हा परिषद कृषी समितीच्या सभेत सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्ती केली. या मुद्यावरील चर्चेत निधी वाढवून देण्याची मागणी सदस्यांनी केली. तसेच शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाºया योजनांसाठी तडजोड केली जाणार नसून, जिल्हा परिषदेच्या आगामी सर्वसाधारण सभेत कृषी विभागाला निधी वाढवून देण्याचा प्रश्न लावून धरण्याचा निर्धारही सदस्यांनी सभेत व्यक्त केला.या विषयावरील चर्चेत काही काळ वादंग झाल्याने कृषी समितीची सभा गाजली. जिल्हा परिषद कृषी सभापती पंजाबराव वडाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला समितीचे सदस्य मोहित तिडके, संजय अढाऊ, अनंत अवचार, अर्चना राऊत, नीता गवई, गीता मोरे, कृषी विकास अधिकारी डॉ. मुरली इंगळे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.बियाणे वाटपासाठी २६ हजार अर्ज; १,१०० शेतकºयाची निवड कशी करणार?जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत १५ लाख रुपयांच्या निधीतून शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटपाची योजना राबविण्यात येत आहे. त्यासाठी जिल्ह्यातील १ हजार १०० लाभार्थी शेतकºयांची निवड करावयाची आहे; परंतु या योजनेंतर्गत २६ हजार शेतकºयांचे अर्ज प्राप्त झाले असून, त्यामधून १ हजार १०० लाभार्थी शेतकºयांची निवड कशी करणार, असा प्रश्न कृषी समितीच्या सदस्यांनी सभेत उपस्थित केला.

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद