शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

कालव्यात पडून बिबटाचा मृत्यू; कुजलेला मृतदेह आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 13:09 IST

बोरगाव मंजू (अकोला) : अकोला तालुक्यातील कोठारी येथील काटेपूर्णा प्रकल्पाच्या कालव्यात पाच वर्षे वयाचा बिबट सोमवारी सकाळी मृत अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

बोरगाव मंजू (अकोला) : अकोला तालुक्यातील कोठारी येथील काटेपूर्णा प्रकल्पाच्या कालव्यात पाच वर्षे वयाचा बिबट सोमवारी सकाळी मृत अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सदर बिबट कालव्याच्या पाण्यात बुडून मरण पावल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.रब्बी हंगामासाठी काटेपूर्णा प्रकल्पावरून कालव्याद्वो पाणी सोडण्यात येत आहे. हा कालवा बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोठारी गावातून पुढे बारुला विभागापर्यंत जातो. सोमवारी सकाळी कोठारी येथील शेतकरी गजानन गावंडे हे शेतात जात असताना त्यांना कालव्यात बिबट मृतावस्थेत पडलेला असल्याचे दिसून आले. त्यांनी बोरगाव मंजू पोलिस व अकोला वन विभागाला माहिती दिली. वन विभागाचे प्रकाश गिते, एन. एम.मोरे , सुरेश गवई, विठ्ठल सारसे आदी घटनास्थळी धाव घेऊन बिबटाचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. सदर बिबट हा अंदाजे वय पाच वर्षे वयाचा असुन पाच ते सहा दिवसापूर्वी मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. मृत्यूचे नेमके कारणे शवविच्छेदनानंतर समजु शकेन असे वनविभागाचे प्रकाश गिते यांनी ‘लोकमत’शी बोलतान सांगितले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी कानशिवनी, खांबोरा शिवारात शेतकº्यांना रात्रीच्या वेळी वाघ दिसल्याचे चर्चा होती. शेतकऱ्यांना हाच बिबट दृष्टीस पडला असावा असा अंदाज आहे. हाा बिबट खांबोरा शिवारातुन कालव्यात वाहुन आला असावा व कोठारीनजीक अडकला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. (वार्ताहर)

 

टॅग्स :Akolaअकोलाleopardबिबट्या