शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात  ‘ईईएसएल’मुळे नगरसेवकांची गोची; प्रस्ताव बदलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 14:00 IST

अकोला :एलईडीची कामे ‘ईईएसएल’ कंपनीमार्फत करण्याचे शासनाचे स्पष्ट निर्देश असल्यामुळे नगरसेवकांनी सुचविलेली प्रभागातील एलईडीची कामे रद्द करावी लागणार असल्यामुळे सर्वपक्षीय नगरसेवकांची गोची झाली आहे.

ठळक मुद्दे‘ईईएसएल’ कंपनीवर शिक्कामोर्तब केल्यामुळे मनपा प्रशासनाने व नगरसेवकांनी तयार केलेल्या विकास कामांच्या प्रस्तावात फेरबदल केला जात आहे. प्रभागातील एलईडीची कामे रद्द करावी लागणार असल्यामुळे सर्वपक्षीय नगरसेवकांची गोची झाली आहे. नऊ कोटींच्या विकास कामांच्या अद्यापही निविदा मंजूर न झाल्यामुळे एलईडीची कामे रद्द करणे प्रशासनाला बंधनकारक आहे.

अकोला : महापालिका क्षेत्रात एलईडी पथदिव्यांसाठी शासनाने ‘ईईएसएल’ कंपनीवर शिक्कामोर्तब केल्यामुळे मनपा प्रशासनाने व नगरसेवकांनी तयार केलेल्या विकास कामांच्या प्रस्तावात फेरबदल केला जात आहे. यापुढे एलईडीची कामे ‘ईईएसएल’ कंपनीमार्फत करण्याचे शासनाचे स्पष्ट निर्देश असल्यामुळे नगरसेवकांनी सुचविलेली प्रभागातील एलईडीची कामे रद्द करावी लागणार असल्यामुळे सर्वपक्षीय नगरसेवकांची गोची झाली आहे. त्यामुळे या विषयावर १७ फेब्रुवारी रोजी आयोजित सर्वसाधारण सभेत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.‘सीएफएल’ पथदिव्यांमुळे विजेची बचत होण्याचा दावा करीत महापालिका प्रशासनाने संपूर्ण शहरात सीएफएलचे पथदिवे लावले. कालांतराने नागरिकांना सीएफएलच्या अंधुक उजेडाचा सामना करण्याची वेळ आली. यावर उपाय म्हणून लख्खं प्रकाश देणाºया एलईडीचा वापर करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. एलईडीचा प्रकाश व विजेची बचत ध्यानात घेता महापालिका स्तरावर एलईडी पथदिवे लावण्यासाठी नगर विकास विभागाने ‘ईईएसएल’ कंपनीची निवड केली. या कंपनीच्या माध्यमातून पथदिवे उभारण्याचे स्पष्ट निर्देश मनपा प्रशासनाला दिले. तत्पूर्वी सुवर्ण जयंती नगरोत्थान व दलितेतर निधीतून होणाºया नऊ कोटींच्या विकास कामांमध्ये प्रशासनासह नगरसेवकांनी मोठ्या प्रमाणात एलईडी पथदिव्यांच्या कामांचा समावेश केला. एलईडीसंदर्भात शासनाने नियुक्त केलेल्या कंपनीचा मुद्दा समोर येताच प्रशासनासह नगरसेवकांची गोची झाली आहे. नऊ कोटींच्या विकास कामांच्या अद्यापही निविदा मंजूर न झाल्यामुळे एलईडीची कामे रद्द करणे प्रशासनाला बंधनकारक आहे. यामुळे प्रभागात एलईडी लावण्यासाठी इच्छुक असणाºया सर्वपक्षीय नगरसेवकांचा चांगलाच हिरमोड झाल्याचे दिसत आहे.२० कोटींच्या कामाला अडथळा नाही!शासनाने ‘ईईएसएल’ कंपनीची नियुक्ती करण्यापूर्वी मनपा प्रशासनाने २० कोटी रुपयांतून शहरातील प्रमुख रस्ते, प्रमुख चौकांमध्ये एलईडी पथदिवे उभारण्याचा कंत्राट दिला आहे. शासन निर्णयाचा २० कोटींच्या कामाला अडथळा नसून, यापुढे एलईडी लावण्यासाठी केवळ ईईएसएल कंपनीची मदत घ्यावी लागणार आहे.

 

टॅग्स :Akola cityअकोला शहरAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका