शहरं
Join us  
Trending Stories
1
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
4
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
5
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
6
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
7
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
8
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
9
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
10
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
11
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
12
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
13
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
14
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
15
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
16
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
17
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
18
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
19
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
20
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात

निगेटिव्ह म्हणून रुग्णाला सुटी; दुसऱ्याच दिवशी पॉझिटिव्ह!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 10:29 AM

एक दिवसापूर्वीच रुग्ण निगेटिव्ह असताना दुसºया दिवशी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्यात आले.

अकोला : रॅपिड अ‍ॅन्टिजन टेस्टचा अहवाल निगेटिव्ह आल्याने मूर्तिजापूर येथील एका रुग्णाला सुटी देण्यात आली होती; मात्र त्याची प्रकृती ठीक नसल्याने कुटुंबीयांनी त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले; मात्र दुसºयाच दिवशी आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे सर्वोपचार रुग्णालयातून समजल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांकडून चाचण्यांवर संशय व्यक्त केला जात आहे.मूर्तिजापूर तालुक्यातील उनखेड गावातील ३० वर्षीय युवकाला ताप आल्याने त्याला ५ जुलै रोजी सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णाला कोरोनाची लक्षणे असल्याने कोरोना चाचणीसाठी डॉक्टरांनी त्याचे नमुने घेतले; परंतु रुग्णाची प्रकृती पाहता डॉक्टरांनी गुरुवार ६ जुलै रोजी त्याची रॅपिड अ‍ॅन्टिजन टेस्टदेखील केली. यामध्ये त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्याला सामान्य वॉर्ड क्रमांक ९ मध्ये हलविण्यात आले; मात्र प्रकृती सुधारत नसल्याने नातेवाइकांनी त्याला सिव्हिल लाइन चौकातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले; मात्र या ठिकाणी उपचारादरम्यान तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती रुग्णाच्या गावातील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून मिळाली. त्यामुळे रुग्णासह त्याच्या नातेवाइकांना चांगलाच धक्का बसला. एक दिवसापूर्वीच रुग्ण निगेटिव्ह असताना दुसºया दिवशी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्यात आले. रुग्णाचा पॉझिटिव्ह अहवाल हा आरटीपीसीआर चाचणीचा आहे.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या