शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

वकिलांना यंदाच्या उन्हाळी सुट्या नाहीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 14:19 IST

वकिलांना यंदाच्या उन्हाळी सुटीचा उपभोग घेता येणार नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: उच्च न्यायालयाने महिनाभराच्या प्रस्तावित उन्हाळी सुट्या रद्द करण्याचा निर्णय घेतला. कोरोनापासून बचावासाठी सध्या सुरू असलेली संचारबंदी ३ मे रोजी संपली, तर मुंबई उच्च न्यायालयाची मुंबई, औरंगाबाद आणि नागपूर खंडपीठे उन्हाळी सुट्या न घेता कामकाज सुरू करतील. सर्व जिल्हा न्यायालयात याप्रमाणेच कामकाज चालणार असल्याने वकिलांना यंदाच्या उन्हाळी सुटीचा उपभोग घेता येणार नाही.याशिवाय न्यायालयाचे कामकाजही नेहमीच्या सकाळी ११ वाजताऐवजी अर्धा तास आधी १०.३० वाजता सुरू होईल, असे उच्च न्यायालयाच्या अधिकाºयांनी स्पष्ट केले आहे; मात्र ३ मेनंतरही संचारबंदी कायम राहिली, तर न्यायालयाचे कामकाज सध्या ‘कोविड-१९’ लॉकडाउनमध्ये सुरू असलेल्या पद्धतीनुसारच सुरू राहणार आहे.३ मेनंतर आणि ७ जूनपूर्वी न्यायालयीन कामकाज ‘लॉकडाउन’ संपल्यानंतर नियमित स्वरूपात पूर्ववत करण्यात आले, तर अशा परिस्थितीत अकोला जिल्ह्यातील सर्व न्यायालये उन्हाळी सुटीचा उपभोग घेणार नाहीत. न्यायालयीन कामकाजाची वेळ सकाळी ११ ते सायंकाळी ५.४५ पर्यंत राहील. कार्यलयीन कामकाजाची वेळ सकाळी १०.३० ते सायंकाळ ६ वाजतापर्यंत राहील.जर न्यायालयीन कामकाज पूर्ववत सुरू होत असेल, तर अशा परिस्थितीत सर्व वकील आणि पक्षकार यांनी नवीन इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वार येथून प्रवेश करावा, तसेच वकील व पक्षकारांकरिता वाहनतळ ‘कोविड-१९’ महामारीच्या आधी असल्याप्रमाणेच अमलात येईल, असे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश य. गो. खोब्रागडे यांनी गुरुवार, २३ एप्रिल रोजी निर्देश दिले आहेत. याबाबतचे पत्र अकोला बार असोसिएशनला प्राप्त झाले असल्याचे अध्यक्ष अ‍ॅड. आनंद गोदे यांनी सांगितले.

टॅग्स :AkolaअकोलाCourtन्यायालय