शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

महाबीजसह तीन कंपन्यांविरुद्ध खटले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 10:28 IST

महाबीजसह वरदान बायोटेक आणि केडीएम सीड्स या कंपन्यांविरुद्ध बियाणे कायद्यांतर्गत बार्शीटाकळी न्यायालयात खटले दाखल करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पेरलेले सोयाबीनचे बियाणे न उगवल्या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे गुरुवारी महाबीजसह वरदान बायोटेक आणि केडीएम सीड्स या कंपन्यांविरुद्ध बियाणे कायद्यांतर्गत बार्शीटाकळी न्यायालयात खटले दाखल करण्यात आले.यंदा मान्सूनच्या सुरुवातीलाच चांगला पाऊस झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीनचा चांगला पेरा केला होता; परंतु पेरलेले बियाणे उगवलेच नसल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले. बियाणे उगवले नसल्याने जिल्हाभरातून कंपन्यांविरुद्ध तक्रारी येऊ लागल्या. तक्रारीसोबतच शेतकºयांनी नुकसानभरपाई म्हणून एकरी उत्पादन खर्चाची मागणी केली होती; मात्र महाबीजसह वरदान बायोटेक आणि केडीएम सीड्स या कंपन्यांकडून शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे करण्यात आलेल्या तपासणीत महाबीजसह इतर खासगी कंपन्यांची बियाणे उगवण क्षमतेत अप्रमाणित निघाल्याचे समोर आले. तसा ठपका बियाणे गुणवत्ता प्रयोगशाळांनी ठेवल्याची माहिती आहे. त्यामुळे कृषी विभागाकडून संबंधित कंपन्यांना कृषी विभागाकडून नोटीस पाठविण्यात आली आहे. त्यापैकी तीन कंपन्यांनी दिलेला खुलासा पटण्याजोगा नसल्याने कृषी विभागाने तीनही कंपन्यांच्या विरोधात बार्शीटाकळी न्यायालयात खटला दाखल केला आहे.

आतापर्यंत पाच कंपन्यांविरोधात खटलाअप्रमाणित सोयाबीन बियाणे प्रकरणी यापूर्वी मूर्तिजापूर तालुक्यात दोन कंपन्यांविरोधात बियाणे उगवणक्षमता कमी असल्याने खटले दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये मे. सारस अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज व मे. प्रगती अ‍ॅग्रो सर्व्हिसेस या कंपन्यांचा समावेश आहे. त्यानंतर गुरुवारी वरदान बायोटेक, केडीएम सिड्स व महाबीज या तीन बियाणे कंपन्यांविरुद्ध बार्शीटाकळी तालुक्यात खटले दाखल करण्यात आले आहेत.

वरदान बायोटेक, केडीएम सिड्स व महाबीज या कंपन्यांच्या बियाण्यांची उगवणक्षमता कमी असल्याच्या कारणावरून त्यांच्या विरोधात बार्शीटाकळी न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी मूर्तिजापूर येथे दोन कंपन्यांवर खटले दाखल करण्यात आले आहे.- मुरलीधर इंगळे,कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, अकोला

 

टॅग्स :MahabeejमहाबीजAkolaअकोलाCourtन्यायालयAgriculture Sectorशेती क्षेत्र