शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

बोगस बियाणे, खतांची विक्री करणाऱ्यांना १० वर्षांच्या शिक्षेचा कायदा करणार - अब्दुल सत्तार 

By आशीष गावंडे | Updated: June 10, 2023 19:50 IST

‘लोकमत’चे संस्थापक संपादक ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी जवाहरलालजी दर्डा यांचे जन्मशताब्दी वर्ष तसेच ‘लोकमत’ अकोला आवृत्तीच्या रौप्यमहोत्सवी वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.

अकोला: राज्याच्या कृषि विभागाने अकोला जिल्ह्यासह राज्यात ८७ ठिकाणी बनावट व निकृष्ट दर्जाची औषधी, बियाणे व खतांची विक्री करणाऱ्यांविरोधात धाडसत्र राबवले असता, ६८ ठिकाणी अनियमितता आढळून आली. व्यावसायिकांनी पेरणीपूर्वी बनावट बियाणे, खते व औषधींचा साठा नष्ट करावा, अन्यथा राज्यपालांकडे तक्रार करण्यासोबतच अशा व्यावसायिकांना किमान १० वर्षांची शिक्षा व्हावी, असा कठोर कायदा येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात मंजूर करणार असल्याचे राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.

लोकमत’चे संस्थापक संपादक ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी जवाहरलालजी दर्डा यांचे जन्मशताब्दी वर्ष तसेच ‘लोकमत’ अकोला आवृत्तीच्या रौप्यमहोत्सवी वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. या सोहळ्याला मुख्य अतिथी म्हणून राज्यपाल रमेश बैस,  प्रमुख उपस्थिती म्हणून लोकमत समुहाच्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा, अध्यक्षस्थानी लोकमतचे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा तसेच समूह संपादक विजय बाविस्कर उपस्थित होते. 

बनावट व निकृष्ट दर्जाची औषधी व बियाण्यांच्या संदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केल्यानंतर राज्यात ८७ ठिकाणी धाडसत्र राबवले. यामध्ये ६८ ठिकाणी अनियमितता आढळून आली. या धाडसत्रानंतर अधिकाऱ्यांवर आरोप झाले. व्यावसायिकांनी आरोप करण्यापेक्षा पोलिसांत तसेच लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाकडे तक्रारी कराव्यात. त्याची शहानिशा केली जाइल. परंतु शेतकऱ्यांसाठी अशा आरोपांची पर्वा करणार नसल्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी ठणकावून सांगितले.

जवाहरलालजी चालते बोलते विद्यापीठ होते!ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी जवाहरलालजी दर्डा यांनी विद्यार्थी दशेपासून देशसेवा, समाजसेवेचा वसा घेतला होता. बाबूजी आमच्यासाठी चालते बोलते विद्यापीठ होते. ‘लोकमत’ शेतकरी, सर्वसामान्य माणसांचा आवाज आहे. राज्य व देशाच्या विकासाला हातभार लावण्यात ‘लोकमत’चा सिंहाचा वाटा असल्याचे गौरवोद्गार कृषिमंत्री सत्तार यांनी काढले.

राज्यभरात धाडसत्र राबविण्याचा प्रस्तावशेतकऱ्यांच्या भविष्याची पर्वा न करता काही व्यावसायिक बनावट खते, बियाणांची विक्री करुन या व्यवसायाला बदनाम करत आहेत. मी राज्यपाल तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पोलिस, महसूल व कृषि विभागामार्फत संयुक्त धाडसत्र सुरु करण्याचा प्रस्ताव देणार असल्याचे कृषिमंत्री सत्तार यांनी सांगितले. 

राज्यपालांचा साधेपणा दिसून आला!राज्यपाल रमेश बैस तब्बल सात वेळा खासदार होते. त्यामुळे त्यांना सर्वसामान्य जनतेच्या समस्यांची जाणीव आहे. ‘लोकमत’च्या कार्यक्रमाला ते पुण्यावरुन ट्रेनद्वारे आले, यावरुन त्यांच्या साधेपणाची प्रचिती आल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले. शेतकऱ्यांप्रती राज्यपालांच्या मनात तळमळ असल्याचे ते यावेळी म्हणाले.

सरकार कोणाचेही असो मी सत्तेत आहोच!राज्यात सरकार कोणाचेही असो, मी सत्तेत आहोच. माझ्या नावातच ‘सत्ता’ आहे. मी चारवेळा निवडून आलो आणि प्रत्येकवेळी मंत्री झाल्याचे सांगत कृषिमंत्र्यांनी चौफेर फटकेबाजी केली. पक्ष कोणताही असो मी हमखास जिंकतो. डोक्यावरील टोपीत कला असल्याचे कृषिमंत्र्यांनी म्हणताच सभागृहात हशा पिकला.

टॅग्स :Abdul Sattarअब्दुल सत्तारLokmatलोकमत